Home /News /technology /

सणासुदीच्या काळात Hyundai कडून जबरदस्त डिस्काउंट्स

सणासुदीच्या काळात Hyundai कडून जबरदस्त डिस्काउंट्स

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ऑटो इंडस्ट्रीवरही मरगळ आल्याचं चित्र आहे. मात्र, आता सणासुदीला सुरुवात झाली असून यामुळे ही मरगळ दूर होऊन हे क्षेत्रही भरारी घेण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर फोर व्हिलर गाड्या उत्पादक Hyundai कंपनीने आगामी उत्सवांसाठी नवीन आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या काळात विविध कंपन्या ऑफर घेऊन येत आहेत. त्यात होंडा आणि डॅटसनने आधीच डिस्काउंटची घोषणा केली आहे. त्यानंतर आता हुंदाईनेही मागे न राहता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या तीन कारवर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. Hyundai Santro ही कंपनीची छोटी कार असून, तिला बजेट कार बायर्सकडून अधिक पसंती मिळत असते. विशेष बाब म्हणजे या कारवर 25 हजारांचा कॅश डिस्काउंट, 15 हजारांचा कॉर्पोरट डिस्काउंट तर 5 हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. असा एकत्रित 45 हजार रुपयांचा हा डिस्काउंट आहे. Hyundai Grand i10 या कारवर एकत्रित 60 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यात 40 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 5 हजारांचा कॉर्पोरट डिस्काउंट, तर 15 हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Hyundai Elantra या कारवर तर तब्बल एक लाख रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत असून या महिन्यात तो दिला जात आहे. यात कॅश डिस्काउंट आणि बोनस मिळणार आहे. मात्र, कारच्या डिझेल वेरियंटवर कॅश डिस्काउंट नसेल. Hyundai Santro cngने दोन नवे प्रकार लाँच केले आहेत. कंपनीने आपल्या एंट्री लेवल हॅचबॅक सँट्रोच्या दोन नव्या ट्रिम भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजीवर आहेत. त्यांची नावं बदलून Hyundai magna executive cng आणि Hyundai Santro Sportz Executive CNG अशी केली आहेत. हे नवीन मॉडेल लाँच झाल्यानंतर सद्यस्थितीतील मॉडेलची विक्री भारतीय बाजारात कंपनीने बंद केली आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये विविध आकर्षक फिचर्सही देण्यात आले आहेत. Hyundai Executive एक्स शोरूम किंमत 5.87 लाख रूपये असून, जी जुन्या मॉडेलपेक्षा 1800 रूपयांनी महाग आहे. नव्या मॉडेलमध्ये 1.1 लिटरचं इंजिन असून, याचं इंजिन हे 5500 आरपीएस वर 59.18 बीएचपीची सर्वाधिक पॉवर तसंच 4500 आरपीएम वर 85.32 चा टॉर्क जनरेट करतं. याच्या इंजिनात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. तर Sportz Executiveची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. जुन्या मॉडेलपेक्षा हे नवं मॉडेल स्वस्त आहे. याचं इंजिन 5500 आरपीएस वर 59.18 बीएचपीची सर्वाधिक पॉवर आणि 4500 आरपीएम वर 85.32 चा टॉर्क जनरेट करतं. याच्या इंजिनात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. स्पोर्ट्स सीएनजीची एक्सशोरूम किंमत 6.2 लाख रुपये आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या