जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram Reels चं नवं अपडेट; टिकटॉकला आता विसरून जाल असं कमाल फिचर

Instagram Reels चं नवं अपडेट; टिकटॉकला आता विसरून जाल असं कमाल फिचर

Instagram Reels चं नवं अपडेट; टिकटॉकला आता विसरून जाल असं कमाल फिचर

इन्स्टाग्रामने रील्समध्ये (Instagram Reels) आणखी एक नवं फिचर ऍड केलं आहे. या फिचरमुळे इन्स्टाग्राम रील्स जवळपास टिकटॉकप्रमाणेच वापरता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉक (TikTok) युजर्समध्ये मोठी नाराजी होती. पण आता या ऍपची कमी भरुन निघणार आहे. इन्स्टाग्रामने रील्समध्ये (Instagram Reels) आणखी एक नवं फिचर ऍड केलं आहे. या फिचरमुळे इन्स्टाग्राम रील्स जवळपास टिकटॉकप्रमाणेच वापरता येणार आहे. इन्स्टाग्रामने रील्समध्ये नवे ऑडिओ फिचर्स जोडले आहेत. आता रील्समध्ये युजर्स ऑडिओ क्लिप सहजपणे सेव्ह करु शकणार आहेत. त्याशिवाय ते शेअरही करता येणार आहेत. या नव्या फिचरमुळे ऑडिओ शेअर आणि सेव्ह करणं सोपं होणार आहे. इन्स्टाग्रामने ही सुविधा सुरु केली असून युजर्स इन्स्टाग्राम अपडेट करून हे फिचर वापरू शकतात. हे वाचा -  आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर! इन्स्टाग्राम रील्स - युजर्स आता specific piece of audio थेट मेसेजद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर करू शकतात. त्यासाठी युजर्सना Save Audio’ feature ऍक्टिव्ह करावं लागेल आणि आपला आवाज किंवा कोणत्याही गाण्याचं म्युझिक ऍपमध्ये आपल्या क्लिपसह सेव्ह करावं लागेल. आपला व्हिडिओ नंतर सहजपणे शोधण्यासाठी इन्स्टाग्रामने ऍपमध्ये बुकमार्क करण्याचीही सुविधा दिली आहे.

हे वाचा -  Jio युजर्ससाठी खुशखबर; या खास सुविधेसाठी कोणताही चार्ज नाही, Netflixही फ्री

Akin to Instagram’sच्या सेव्ह पोस्ट फिचरद्वारे ऑडिओ टॅप करून, सेव्ह आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तो सेव्हही करता येणार आहे. सेव्ह केलेल्या सर्व ऑडिओ फाईल इन्स्टाग्रामवर पोस्ट सेक्शनमध्ये ऑडिओ फोल्डरच्या खाली मिळतील. इन्स्टाग्रामने शॉर्ट व्हिडिओ तयार करण्याची सुविधा काही दिवसांपूर्वी लॉन्च केली होती. हे फिचर लॉन्च करण्याचा उद्देश टिकटॉकसारख्या कंपनीशी स्पर्धा करणं हा होता. परंतु चीन आणि भारताच्या तणावपूर्ण स्थितीत सरकारने चीनी ऍप्सवर बंदी आणली आणि टिकटॉकही बॅन झालं. त्यामुळे अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम रील्स वापरण्याची मोठी संधी निर्माण झाली.

हे वाचा -  Anti trust प्रकरण : Google च्या विश्वासार्हतेला तडा?

इन्स्टाग्राम रील्समध्ये अनेक अपडेट गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामने युजर्सला 15 सेकंदाऐवजी 30 सेकंद व्हिडिओ करण्याची परवानगी दिली. युजर्सच्या चांगल्या प्रतिक्रियेनंतर आणखी 10 सेकंद वाढवण्याची सुविधा देण्यात आली. तसंच ट्रिमद्वारे कोणत्याही क्लिपला हटवण्याची सुविधाही ऍडऑन केली आहे. युजर्सला आपले व्हिडिओ सहजपणे शोधण्यासाठीही इन्स्टाग्रामने पर्याय दिला आहे. हे वाचा -  WhatsApp आत्ताच करा अपडेट : मिळत आहेत नवी फीचर आणि ढीगभर इमोजी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram
  • First Published :
जाहिरात
जाहिरात