मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?

लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?

‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.

‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.

‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : गेल्या महिन्यात एका व्हर्चुअल इव्हेंटद्वारे अ‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं. टोकयो बेस्ड रिसर्च स्पेशलिस्ट Fomalhaut Techno Solutions सह मिळून Nikkei ने iPhone 12 आणि iPhone 12 Pro च्या Bill of Materials चा (BoM) खुलासा केला आहे. ज्यात आयफोनच्या वास्तविक किंमतीची माहिती मिळली आहे.

रिपोर्ट्सनुसार, iPhone 12 बनवण्यासाठी 373 डॉलर म्हणजेच जवळपास 27,500 रुपये आणि iPhone 12 Pro बनवण्यासाठी 406 डॉलर, जवळपास 30,000 रुपयांचा खर्च येतो. जो वास्तविक किंमतीच्या अतिशय कमी आहे.

पण, आयफोन केवळ बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चानंतर त्यावर ओवरहेड चार्ज लावले जातात. त्यानंतर रिटेल किंमती ठरवल्या जातात. भारतात iPhone 12 ची किंमत 79,900 रुपये आणि iPhone 12 Pro ची किंमत 1,19,900 रुपये आहे.

कोणते पार्ट्स आहेत सर्वात महाग?

iPhone 12 आणि iPhone 12 Pro मध्ये लावण्यात येणारा Qualcomm X55 5G मोडेम, सॅमसंगद्वारा निर्मित OLED डिस्प्ले, सोनीचा कॅमेरा सेन्सर आणि A14 बायोनिक चिप सर्वात महागडे पार्ट्स आहेत. या किंमतींचा खुलासा Nikkei च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Qualcomm X55 5G मोडेमची किंमत 90 डॉलर म्हणजे जवळपास 6,656 रुपये, OLED डिस्प्ले 70 डॉलर, म्हणजे 5177 रुपये, कॅमेरा सेन्सर 5.40-7.40 डॉलर, जवळपास 399 ते 547 रुपये प्रति यूनिट आहे. या रिपोर्टमध्ये असाही खुलासा करण्यात आला की, कंपोनेंट्सला एक्स्ट्रा स्पेस देण्यासाठी iPhone 12 सीरीजच्या बॅटरी कॅपेसिटीमध्ये 10% कपात करण्यात आली आहे.

कुठून येतात पार्ट्स -

रिपोर्टमध्ये, iPhone 12 चे पार्ट्स बनवण्यासाठी कोणत्या देशाची किती भागीदारी आहे, हेदेखील सांगण्यात आलं आहे. यात साउथ कोरियाची भागीदारी सर्वाधिक आहे. फोनचे 26.8 टक्के पार्ट तिथूनच येतात. त्यानंतर यूएस आणि यूरोप यांची भागीदारी 21.9 टक्के आहे. कंपोनेंट शेयरमध्ये चीनची भागीदारी 5 टक्क्यांहून कमी आहे. जपानकडे 13.6 टक्के आणि तायवानकडे 11.1 टक्के भागीदारी आहे.

First published:

Tags: Iphone