• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • OMG! याचा हात आहे की मधमाश्यांचं घर; डेअरिंगला द्यायला हवी दाद

OMG! याचा हात आहे की मधमाश्यांचं घर; डेअरिंगला द्यायला हवी दाद

मधमाश्या (Bee Colony) जंगलात झाडांवर किंवा उंच इमारतींवर असल्याचं आपण बघतो. पण या पठ्ठ्याच्या हातावरच मधमाश्यांनी घर केलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 30 जानेवारी : गोड मध आवडत असलं तरी मधमाशी (Bee) म्हटलं तरी आपल्याला भीती वाटते. चुकून कधी घरात एखादी मधमाशी आली तरी भीती वाटते. मधमाशी चावली तर प्रचंड वेदना होतात. त्या भागावर सूज येते, मधमाश्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याच्या घटनाही आपण ऐकल्या आहेत. त्यामुळं मधमाशी म्हटलं की बहुतांश लोक घाबरून दूर पळतात; पण सध्या सोशल मीडियावर एका धाडसी तरुणाचा व्हिडिओ पहायला मिळत आहे. ज्यात हा मुलगा चक्क मधमाश्यांचं पोळंच हातावर घेऊन फिरत आहे. अनेक लोक काहीतरी आगळं वेगळं करून सर्वांचं लक्ष वेधत असतात. सध्या अशाच एका अतरंगी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधमाश्यांचे पोळे (Bee Colony) जंगलात झाडांवर किंवा उंच इमारतींवर असल्याचं आपण बघतो. आजकाल मधमाशी पालन केलं जातं तिथं पेट्यांमध्ये मधमाश्या असतात. पण या पठ्ठ्याच्या हातावरच मधमाश्यांचं पोळं आहे. दंडापासून तळहातापर्यंत सर्वत्र मधमाश्या बसलेल्या आहेत. त्याच्या हाताचा जरासुद्धा भाग उघडा दिसत नाही.  जणू हे पोळं तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत आहे. तरीही हा मुलगा अगदी शांतपणे चालत जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते बघून लोक चकित झाले आहेत. हे वाचा - 'एलियन'सारखं दिसण्यासाठी त्यानं स्वतःचा ओठच कापून टाकला हा व्हिडिओ अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून, आतापर्यत याला 8 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंटसचा पाऊस पाडला आहे. एकानं म्हटलं आहे की, मधमाश्यांची राणी (Queen Bee) माशी त्याच्या हातावर बसल्यानं इतर सैनिक माशाही तिच्याभोवती बसल्या आहेत.  हा मुलगा हॉस्पिटलमध्ये जात आहे का? अशी कमेंट एकानं केली आहे तर एका जीवशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांनी म्हटलं आहे की,  मी गेली 20 वर्षे जीवशास्त्र शिकवत आहे. निसर्गातील अनेक चमत्कारांचे व्हिडिओ पाहिले आहेत, पण हा सर्वांत चमत्कारिक व्हिडिओ आहे. या मुलाकडे सुपरपावर आहे का? असा प्रश्नही एकानं विचारला आहे. हे अविश्वसनीय आहे, असंही एकानं म्हटलं आहे. हे वाचा - सर्वांत उंच गौतम बुद्धांचा पुतळा देशात उभा राहणार; पाहा काय आहे प्लॅन या व्हिडिओमुळं हा मुलगा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. व्हिडिओ बघून तो कोणत्या भागातील आहे, या मुलाचं नाव काय, तो मधमाशी पालन करतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत, पण या मुलानं सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. त्याच्या धाडसामुळं सोशल मीडियावर तो हिरो ठरला आहे.
Published by:news18 desk
First published: