Home /News /technology /

4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त आणि किंमत कमी

4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त आणि किंमत कमी

तुमचं बजेट 4 लाखांपर्यंत असेल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या काही हॅचबॅक गाड्या तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतील.

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदी करण्याचा विचार आहात, आणि तुमचं बजेट 4 लाखांपर्यंत असेल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीच्या काही हॅचबॅक गाड्या तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतील. मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये, भारतात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झालेली हॅचबॅक कार Altoवर सूट दिली आहे. ही बजेट कार असून फ्यूल एफिशिएंटही आहे. Maruti Suzuki Alto - ऑल्टो 800 वर 18 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे. मारुती ऑल्टो देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. मारुतीने नेहमी सामान्य भारतीयांच्या गरजांचा विचार करुन आपल्या कारची निर्मिती केली आहे. यात 796cc चं इंजिन लावण्यात आलं आहे. मारुति सुझुकी ऑल्टो 1 लीटर पेट्रोलमध्ये 22.05 kmpl मायलेज देते. तर CNG मॉडेलचं मायलेज 31.59 Km/kg आहे. Alto 2,94,800 रुपये (एक्स शोरूम) किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

  (वाचा - ..अन्यथा अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)

  Maruti S-Presso - मारुतीने S-Presso मध्ये 998cc चं 3 सिलेंडर K10B पेट्रोल इंजिन दिलं आहे. मारुति एस-प्रेसो 1 लीटर पेट्रोलमध्ये 21.4 किलोमीटर मायलेज देते. या कारची किंमत 3.7 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. BS6 Datsun Go - Datsun Go मध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. BS6 Datsun Go 19.02 kmpl आणि CVT मध्ये 19.59 kmpl देण्यात सक्षम आहे. ही कार 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) खरेदी करता येऊ शकते.

  (वाचा - आता चोरी होणार नाही तुमची कार; 'हे' हायटेक लॉक होणार गार्ड)

  Renault Kwid BS6 - Renault Kwid BS6 मध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. ही कार 21-22 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. Renault Kwid BS6 ची सुरुवाती एक्स शोरूम किंमत 2.92 लाख रुपये आहे.

  (वाचा - Whatsapp chat कसं लीक होतं? जाणून घ्या कसं कराल कायमस्वरुपी डिलिट)

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या