• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Aadhaar Card हरवलंय? घरबसल्या अशी डाउनलोड करा ई-कॉपी

Aadhaar Card हरवलंय? घरबसल्या अशी डाउनलोड करा ई-कॉपी

जर आधार कार्ड हरवलं, तर मोठी समस्या येते. परंतु सोप्या पद्धतीने घरबसल्या आधार कार्डची ई-कॉपी डाउनलोड करता येते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. खासगी-सरकारी सर्वच कामांसाठी आधार कार्ड मागितलं जातं. अशात जर आधार कार्ड हरवलं, तर मोठी समस्या येते. परंतु सोप्या पद्धतीने घरबसल्या आधार कार्डची ई-कॉपी डाउनलोड करता येते. ऑनलाईन आधार कार्ड कसं मिळवाल? - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा. - त्यानंतर 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' पर्यायावर क्लिक करा. - इथे नाव, ईमेल ID, रजिस्टर्ड मोबाइल नंबरसह इतर विचारलेले डिटेल्स भरावे लागतील. - त्यानंतर कॅप्चा कोड वेरिफाय करुन Send OTP वर क्लिक करावं लागेल. - आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सहा अंकी OTP मिळेल, तो वेबसाइटवर दिलेल्या ठिकाणी भरा. - इथे मोबाइलवर UID/EID नंबर मिळेल. ई-आधार कॉपी डाउनलोड करण्यासाठी UID/EID नंबरचा उपयोग करा.

  या 6 गोष्टी लक्षात ठेवून करा Smart Shopping; फसव्या ऑफर्स, कर्जापासून राहाल दूर

  आधार कार्ड पुन्हा कसं प्रिंट कराल? - UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. - त्यानंतर 'Order Aadhaar Reprint' वर क्लिक करा. - आधार संख्या - UID, मामांकन आयडी - EID किंवा वर्चुअल आयडी VID पैकी एक पर्याय निवडा - 'Terms & Conditions' बॉक्सवर चेक करा आणि सबमिटवर क्लिक करा. - आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि अनरजिस्टर्ड मोबाइल नंबरपैकी एक पर्याय निवडा. - आता कॅप्चासह आधार नंबर किंवा वर्चुअल आयडी नंबर टाका आणि Request OTP वर क्लिक करा. आलेला ओटीपी भरा. - त्यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. इथे ऑनलाइन पेमेंट करावं लागेल. - त्यानंतर पावती डाउनलोड करा. आता आधार कार्ड प्रिंट होईल आणि रजिस्टर्ड पत्त्यावर पाठवलं जाईल.
  Published by:Karishma
  First published: