Home /News /technology /

TRICK: Instagram अकाउंटवरुन कशाप्रकारे लॉग इन करता येईल Facebook? फॉलो करा या स्टेप्स

TRICK: Instagram अकाउंटवरुन कशाप्रकारे लॉग इन करता येईल Facebook? फॉलो करा या स्टेप्स

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करत असाल तर हे दोन्ही अकाउंट एकमेकांशी तुम्ही इंटरलिंक (How to Connect Instagram to Facebook ) करू शकता. ते कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया.

मुंबई, 26 जानेवारी: सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फेसबुक, ट्विटर , व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम (Instagram ) असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. यात फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) सर्वाधिक लोकप्रिय आहेत. याद्वारे मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्कात राहता येते. या दोन्ही कंपन्यांची मालकी मेटा कंपनीकडे आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करत असाल तर हे दोन्ही अकाउंट एकमेकांशी तुम्ही इंटरलिंक (How to Connect Instagram to Facebook ) करू शकता. ते कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया. फेसबुक अकाउंटला इन्स्टाग्राम अॅपच्या माध्यमातून इंटरलिंक करता येते. iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही हे अकाउंट इंटरलिंक करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या फेसबुक मित्रांना इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता. तसेच फेसबुकवर इन्स्टाग्राम पोस्टही शेअर करू शकता. पण तुम्ही थेट फेसबुकवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करू शकत नाही. हे वाचा-लॉक झालंय Gmail Account? अशाप्रकारे पुन्हा करा सुरू, आहेत सोप्या स्टेप्स इन्स्टाग्रामवर तुमचे फेसबुक अकाउंट शोधण्यासाठी, इन्स्टाग्रामच्या प्रोफाइलमध्ये जा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या हॉरिझॉन्टल लाइन्सवर क्लिक करा. त्यानंतर 'डिस्कव्हर पीपल' या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर स्क्रीनवरील कनेक्ट फेसबुक या पर्यायावर टॅप करा. यानंतर कनेक्टवर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करा. यात विशेष बाब म्हणजे इन्स्टाग्रामवरून फेसबुक लॉग इन करताना, फेसबुकचा पासवर्ड हा तुमच्या इन्स्टाग्रामचा जो पासवर्ड आहे, तोच असतो. आपले इन्स्टाग्राम अकाउंट फेसबुकला कनेक्ट करणे म्हणजे, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात येणाऱ्या सर्व स्टोरी आणि पोस्ट फेसबुकवर आपोआप शेअर होतील. यात फक्त iOS आणि Android डिव्हाइसेसवरूनच तुम्ही इन्स्टाग्राम अॅपशी फेसबुक कनेक्ट करू शकता. फेसबुकवरून इन्स्टाग्राममध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही इन्स्टाग्राम पोस्ट फेसबुकवर शेअर करू शकता. पेजचा अडमिन किंवा एडिटर तुमच्या पेजवरील स्टोरीज इन्स्टाग्रामवर शेअर करू शकतो. तसेच फेसबुकवर करण्यात आलेले अपडेट इन्स्टाग्रामवरदेखील दिसतील. हे वाचा-Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ची माहिती इन्स्टाग्राम अकाउंट फेसबुकपासून डिसकनेक्ट कसं करावं? याशिवाय Instagram आणि Facebook अकाउंट लिंक केली असतील आणि तुम्हाला हे नको असेल तर आम्ही तुम्हाला दोन्ही अकाउंट डिसकनेक्ट करू शकता. यासाठी तुम्ही खालील स्टेप फॉलो करा. पहिल्यांदा इन्स्टाग्राम प्रोफाइल वर जा. यानंतर मेन्यू पर्यायावर क्लिक करा. आता सेटिंगमध्ये जा. त्यानंतर अकाउंट सेंटरवर जा. आता अकाउंट अॅण्ड प्रोफाइल पर्यायावर टॅप करा. अनलिंक करायचे असलेल्या अकाउंटला क्लिक करा आणि 'रिमूव्ह फ्रॉम अकाउंट्स सेंटर' वर टॅप करा. असे केल्यानंतर तुमच्या कोणत्याही इन्स्टाग्राम पोस्ट फेसबुकवर आपोआप शेअर होणार नाहीत.
First published:

Tags: Facebook, Instagram

पुढील बातम्या