मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लॉक झालंय Gmail Account? अशाप्रकारे पुन्हा करा सुरू, आहेत सोप्या स्टेप्स

लॉक झालंय Gmail Account? अशाप्रकारे पुन्हा करा सुरू, आहेत सोप्या स्टेप्स

जीमेलमध्ये लॉग इन करण्यासाठी दर वेळी युझर आयडी आणि पासवर्ड वापरावा लागतो. दरम्यान काही वेळा जीमेल अकाउंट लॉक (Gmail Account Lock) होतं. अशा वेळा पुन्हा जीमेल वापरण्यासाठी काय कराल?

जीमेलमध्ये लॉग इन करण्यासाठी दर वेळी युझर आयडी आणि पासवर्ड वापरावा लागतो. दरम्यान काही वेळा जीमेल अकाउंट लॉक (Gmail Account Lock) होतं. अशा वेळा पुन्हा जीमेल वापरण्यासाठी काय कराल?

जीमेलमध्ये लॉग इन करण्यासाठी दर वेळी युझर आयडी आणि पासवर्ड वापरावा लागतो. दरम्यान काही वेळा जीमेल अकाउंट लॉक (Gmail Account Lock) होतं. अशा वेळा पुन्हा जीमेल वापरण्यासाठी काय कराल?

    मुंबई, 26 जानेवारी: आजच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियाचा वापर वाढलेला असला, तरी ऑफिसमधली डॉक्युमेंट्स (Documents), आपल्या वैयक्तिक कामाच्या फाइल्स, जॉबसाठी अर्ज समोरच्याला पाठवण्यासाठी ई-मेलचा वापर केला जातो. त्यामुळे आता पूर्वीसारख्या कागदी स्वरूपातल्या फाइल्सची गर्दी होत नाही. अलीकडच्या काळातील ई-मेलसाठीचा सर्वांत लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे जीमेल हा आहे. जगभरात बहुतांश ठिकाणी गुगलच्या जी-मेलचाच (Gmail) वापर केला जातो. जीमेलचा वापर न करणाऱ्या फार कमी व्यक्ती आढळतील. जीमेल अगदी सहजपणे हाताळता येतंच, त्याचबरोबर सुरक्षितही आहे. त्यामुळे जीमेल वापरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ऑफिसच्या कामासह इतर अनेक कामांसाठी जीमेलला सर्वाधिक पसंती दिली जाते.

    अशअशा वेळी तातडीची गरज असेल तर त्याचा अ‍ॅक्सेस (Gmail Access) कसा मिळवायचा हा फार मोठा प्रश्न असतो. कामाच्या गडबडीत असा काही गोंधळ झाला तर अडचणीचं होतं; पण अशा वेळी अगदी साध्या सोप्या उपायाने जीमेल अकाउंट अ‍ॅक्सेस करता येतं. झी न्यूजनं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    हे वाचा-Traffic Rule:...तर 23000 रुपये भरावा लागेल दंड,बाइक चालवताना हे नियम लक्षात ठेवा

    समजा काही कारणास्तव तुमचं जीमेल अकाउंट लॉक झालं किंवा तुम्ही लॉग आउट (Log Out) केलं असेल आणि तुम्हाला पासवर्ड (Password) आठवत नसेल, तर तुम्ही अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग वापरू शकता, तो म्हणजे साइन-इन प्लॅटफॉर्म (Sign -in Platform) बदलण्याचा. पासवर्डऐवजी तुमच्या फोन नंबरच्या साह्याने तुम्हाला लॉग इन करता येईल. रिकव्हरी ईमेल आयडी किंवा फोन नंबरदेखील तुम्ही वापरू शकता. यावर तुम्हाला पासवर्ड किंवा ओटीपी (OTP) मिळेल, तो वापरून लॉग इन करता येईल.

    याशिवाय, तुम्ही ज्या डिव्हाइसवरून लॉग इन करता ते डिव्हाइस (Device) किंवा ठिकाण (Location) याचा वापर करून जीमेल अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळवू शकता. तुम्ही काय शेअर केलं होतं हे तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही गुगल सर्च (Google Search) वापरून रिकव्हरी इन्फॉर्मेशनही मिळवू शकता.

    तुम्ही अँड्रॉइड मोबाइल युझर (Android Mobile Users) असाल तर ही पद्धत खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटमधून लॉग आउट केलं असेल किंवा तुमचे अकाउंट लॉक झालं असेल, तर तुम्ही गुगल ऑथेंटिकर (Google Authenticator) अ‍ॅप वापरून लॉग इन करू शकता. कारण सगळे अँड्रॉइड मोबाइल फोन्स गुगल अकाउंटशी जोडलेले असतात.

    हे वाचा-WhatsApp च्या Security साठी मिनिटांत अ‍ॅक्टिवेट करा Two Step Verification

    अॅपल युझर (Apple User) असाल, तर तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचा आयफोन (iPhone) किंवा आयपॅडवर (iPad) लॉग इन केलेलं गुगल अकाउंट (Google Account) वापरू शकता. लॉग इन केलेलं डिव्हाइस पासवर्ड (Password) विचारणार नाही. याद्वारे तुम्ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून जीमेलचा अॅक्सेस मिळवू शकता.

    तेव्हा गडबडीच्या वेळी जीमेल अकाउंट लॉक झालं तरी काळजी करू नका. या उपायांचा वापर करा आणि आपलं काम पुन्हा सुरू करा.

    First published:
    top videos

      Tags: Gmail