• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • धमाकेदार ऑफर; केवळ 1 रुपयांत मिळवा जबरदस्त ProBuds Earbuds, 25 तासांपर्यंत चालेल बॅटरी

धमाकेदार ऑफर; केवळ 1 रुपयांत मिळवा जबरदस्त ProBuds Earbuds, 25 तासांपर्यंत चालेल बॅटरी

या ईयरबड्सचं डिझाईन Lava ने अनेक टेस्ट आणि कानाच्या अंतर्गत डिझाईनचा अभ्यास केल्यानंतर बनवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जून: भारतातील टेक्नोलॉजी कंपनी लावाने (Lava) आपले पहिलेच Probuds ईयरबड्स भारतात लाँच केले आहेत. या ईयरबड्सचं डिझाईन लावाने अनेक टेस्ट आणि कानाच्या अंतर्गत डिझाईनचा अभ्यास केल्यानंतर बनवण्यात आल्याचं सांगितलं आहे. यासह कंपनीने ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन्स सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. लावाचे हे नवे ईयरबड्स ऑफरमध्ये केवळ एक रुपयांत मिळणार आहे. हे ईयरबड्स ग्राहक लावा स्टोर आणि ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनवर खरेदी करता येतील. Lava कंपनीचे हे Probuds Earbuds जबरदस्त चार्जिंग केससह येतात. हे ईयरबड्स सिंगल चार्जमध्ये 25 तासांपर्यंत वापरता येऊ शकतात. लावाचे हे ईयरबड्स स्वेट आणि वॉटर रेसिस्टेंट आहेत, जे IPX5 रेटिंगसह येतात. MediaTek Airoha चिपसेटवर हे काम करतात, ज्यात 11.6 MM चे ड्रायवर्स देण्यात आले आहेत. 25 तासांपर्यंत चालणार बॅटरी - कंपनीने या ईयरबड्स चार्जिंग केसमध्ये 500 mAh बॅटरीचा वापर केला आहे. तर Probuds ईयरबड्समध्ये 55mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चार्जिंग केससह Probuds ईयरबड्स 25 तासांपर्यंत वापरता येऊ शकतात. Wake and Pair या टेक्नोलॉजीचा यात वापर करण्यात आला आहे. त्यानुसार चार्जिंग केस ओपन केल्यानंतर ईयरबड्स आपोआप ऑन होऊन कनेक्शन मोडमध्ये येतील.

  (वाचा - वाहन चालकांना सरकारचा दिलासा! कार चालवण्याचा खर्च 35 लीटरपर्यंत कमी होणार)

  कनेक्टिव्हिटीसाठी ईयरबड्समध्ये ब्लूटूथ v5 आणि मायक्रो USB चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याचं वजन 77 ग्रॅम आहे. या ईयरबड्सची किंमत 2,199 रुपयांपर्यंत आहे. अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहक याची खरेदी करू शकतात. कंपनीच्या इंट्रोडक्टरी ऑफरनुसार, ग्राहक हे ईयरबड्स 24 जून रोजी असणाऱ्या सेलमध्ये 1 रुपयांत खरेदी करू शकतात. हा सेल दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ब्लॅक कलरमध्ये ईयरबड्स असून कंपनीने एक वर्षांची वॉरंटीही ऑफर केली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: