OPPO चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OPPO चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

या फोनचा कॅमेरा या फोनची सर्वात खास बाब आहे. oppo reno 5 pro जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल, जो 50 मेगापिक्सल सोनी IMX7xx सीरीज लेन्ससह आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : OPPO Reno 5 Pro 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा ओप्पो Reno 5 सीरीजचा भाग आहे. याच महिन्यात कंपनीने या सीरीजचे आणखी दोन स्मार्टफोन OPPO Reno 5 Pro आणि Reno 5 लाँच केले होते. Reno 5 Pro 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. Reno 5 Pro चं डिझाईन Reno 5 Pro शी मिळतं जुळतं आहे.

OPPO Reno 5 Pro 5G च्या 8GB 128GB वेरिएंटची किंमत चीनमध्ये RMB 3,999 म्हणजेच जवळपास 45,000 रुपये आहे. तर 12GB 256GB वेरिएंटची किंमत RMB 4,499 म्हणजेच 50,600 रुपये इतकी आहे. हा फोन स्टार रिवर ड्रीम आणि फ्लोटिंग नाईट शॅडो कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

चीनमध्ये 29 डिसेंबरपासून याची विक्री सुरू होणार आहे. सध्या OPPO Reno 5 Pro 5G च्या भारतातील लाँचिंगबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एका टिप्स्टरनुसार, कंपनी Reno 5 Pro आणि Reno 5 पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे.

OPPO Reno 5 Pro 5G स्पेसिफिकेशन्स -

- अँड्रॉईड 11 बेस्ड ColorOS 11

- 6.55 इंची FHD पंच होल AMOLED डिस्प्ले

- 12GB रॅमसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर

- 4,500mAh बॅटरी

- 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट

कॅमेरा -

मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा कॅमेरा या फोनची सर्वात खास बाब आहे. oppo reno 5 pro जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल, जो 50 मेगापिक्सल सोनी IMX7xx सीरीज लेन्ससह आहे. OPPO Reno 5 Pro 5G स्मार्टफोनला रियरमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. 16MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 13MP टेलिफोटो कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा असून सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 26, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या