जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram चं नवं Vanish Mode फीचर; आता चॅटिंगमध्ये होणार असा बदल

Instagram चं नवं Vanish Mode फीचर; आता चॅटिंगमध्ये होणार असा बदल

Instagram चं नवं Vanish Mode फीचर; आता चॅटिंगमध्ये होणार असा बदल

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : फेसबुकने (Facebook)इन्स्टाग्राम (Instagram)या आपल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. इन्स्टाग्राम युजर्समध्ये या फीचरबद्दल मोठी उत्सुकता आहे. इन्स्टाग्राम तरुण पिढीमध्ये सर्वांत लोकप्रिय असून, फोटोसाठी याचा जास्तीत जास्त वापर होतो. नोव्हेंबरमध्येच कंपनीने या फिचरची घोषणा केली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतातील इन्स्टाग्राम युजर्ससाठी ‘व्हॅनिश मोड’(Vanish Mode)हे नवीन फीचर दाखल करण्यात आलं आहे. हे एक प्रकारचं प्रायव्हसी फिचर आहे. याद्वारे युजर्सना कोणताही ट्रेस न ठेवता चॅटिंग करता येते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : फेसबुकने (Facebook)इन्स्टाग्राम (Instagram)या आपल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. इन्स्टाग्राम युजर्समध्ये या फीचरबद्दल मोठी उत्सुकता आहे. इन्स्टाग्राम तरुण पिढीमध्ये सर्वांत लोकप्रिय असून, फोटोसाठी याचा जास्तीत जास्त वापर होतो. नोव्हेंबरमध्येच कंपनीने या फिचरची घोषणा केली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतातील इन्स्टाग्राम युजर्ससाठी ‘व्हॅनिश मोड’(Vanish Mode)हे नवीन फीचर दाखल करण्यात आलं आहे. हे एक प्रकारचं प्रायव्हसी फिचर आहे. याद्वारे युजर्सना कोणताही ट्रेस न ठेवता चॅटिंग करता येते. इन्स्टाग्राममध्ये काय फरक झाला? फेसबुकने इन्स्टाग्राम इनबॉक्सची रचना मेसेंजरसारखी केली आहे. यासाठी इन्स्टाग्रामचा आयकॉनही बदलण्यात आला असून, तो अगदी मेसेंजरसारखाच दिसतो. त्याचबरोबर फेसबुकने क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग सेवाही सुरू केली आहे. तसंच आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकावेळी 50 लोकांना व्हिडिओ कॉलवर जोडता येणार आहे.

(वाचा -  Made in India देशातील पहिलं सेल्फ सॅनिटायझिंग फेस मास्क; काय आहे किंमत, फीचर्स )

Vanish Mode कसं वापरता येईल? तुमच्या इन्स्टाग्रामवर तुम्हाला व्हॅनिश मोड हे फीचर वापरायचं असेल, तर इन्स्टाग्राम ओपन करा. त्यातील मेसेंजर (messenger) ओपन करा. त्यानंतर ज्यांच्याबरोबर चॅटिंग (Chatting) करताना हे फीचर वापरायचं आहे, त्यांचा चॅटिंग बॉक्स ओपन करा. आता तुमच्या स्मार्टफोनच्या (Smartphone) स्क्रीनवर वरच्या दिशेने स्वाईप करा. व्हॅनिश मोड अॅक्टिव्हेट होईल आणि तुम्ही मेसेजही करू शकता. हे फिचर वापरून ज्यांच्याबरोबर चॅटिंग करत असाल त्यांनाही व्हॅनिश मोड अॅक्टीव्हेट असल्याचं नोटीफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युजरने मेसेज वाचला की थोड्याच वेळात तुमच्याकडील मेसेज डिलीट होईल.

(वाचा -  FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज )

व्हॅनिश मोड वापरत असताना आलेल्या एखाद्या मेसेजचा स्क्रीन शॉट काढला तर त्याची माहितीही मेसेज पाठवणाऱ्याला नोटीफिकेशनद्वारे मिळेल. याशिवाय व्हॅनिश मोडद्वारे टेक्स्ट, ऑडियो, व्हिडीओ आणि जिफ फाईल्सही पाठवता येतात. ज्या क्षणी युजर मेसेज वाचेल त्याक्षणी तो डिलीट होईल. अनेकांना आपल्या चॅटिंगचे पुरावे नष्ट करता येतील. तर चॅट बॉक्स खूप भरल्यामुळे येणाऱ्या अडचणीही आता दूर होतील. चॅट बॉक्स क्लिअर करण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. हवे तेवढे टेक्स्ट, व्हिडीओ, ऑडियो आता इन्स्टाग्रामवरून पाठवता येतील. अलीकडेच व्हॉटसअॅपसाठी आणलेल्या डिसअॅपिअरिंग मेसेज या फीचर सारखंच हे फीचर असून, यामुळे चॅट बॉक्स क्लिअर ठेवणं सोपं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram
  • First Published :
जाहिरात
जाहिरात