मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चालत्या Lamborghini Urus ने घेतला पेट; 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेली आलिशान कार काही क्षणांतच खाक

चालत्या Lamborghini Urus ने घेतला पेट; 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेली आलिशान कार काही क्षणांतच खाक

Lamborghini Urus Fire : कोट्यवधी रुपयांची ही आलिशान, नवी कार मालकाच्या डोळ्यादेखत कोळसा झाली.

Lamborghini Urus Fire : कोट्यवधी रुपयांची ही आलिशान, नवी कार मालकाच्या डोळ्यादेखत कोळसा झाली.

Lamborghini Urus Fire : कोट्यवधी रुपयांची ही आलिशान, नवी कार मालकाच्या डोळ्यादेखत कोळसा झाली.

तैपई, 11 मे :  तैवानमध्ये (Taiwan) फ्रीवेवरून (Freeway) जात असलेल्या एका लॅम्बोर्गिनी युरूस (Lamborghini Urus) या आलिशान कारने अचानक पेट (Blaze) घेतला आणि बघता बघता ही कार आगीच्या ज्वालांनी वेढली गेली आणि जळून खाक झाली. सुदैवाने ड्रायव्हर आग भडकण्याआधीच कारमधून बाहेर पडल्यानं त्याचा जीव वाचला. या जळत्या लॅम्बोर्गिनीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, तैवानमधील राष्ट्रीय महामार्गावरून ही काळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी युरूस कार जात होती. अचानक तिनं पेट घेतला. बाजूने जाणाऱ्या कारमधील व्यक्तीने या कारमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचं पाहिलं आणि ड्रायव्हरला त्याची सूचना दिली. त्याबरोबर ड्रायव्हरनं लहेच कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बाहेर उडी घेतली. त्यानंतर त्यानं अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही कार जळून कोळसा झाली होती. हे वाचा - आता कोणतंही आर्टिकल शेअर करण्यापूर्वी ते वाचावं लागणार; Facebook चं नवं फीचर या जळणाऱ्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला एक मॅट-ब्लॅक रंगाची लॅम्बोर्गिनी युरूस एसयूव्ही उभी असून ती आगीच्या ज्वालांनी वेढली असल्याचं दिसत आहे. तिथं आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवली. पण तोपर्यंत ती कार जळून गेल्याचं दिसत आहे. या कारचा मालक  व्यावसायिक असून त्यानं 8 महिन्यांपूर्वीच ही अलिशान एसयूव्ही खरेदी केली होती. वेळीच त्याला लोकांनी सावध केल्यामुळे तो या भीषण अपघातातून बचावला. इतक्या नव्या कोऱ्या कारमध्ये आग कशी लागली हे कोडंच आहे, अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथून जात असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरनं ही पेटलेली कार बघितली आणि आपल्याकडील अग्निशामक उपकरणांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ही कार पेटतच राहिली आणि या अलिशान, देखण्या कारचं रुपांतर जळलेल्या लोखंड आणि प्लास्टिकच्या सांगाड्यात झालं. चंगुआ काउंटी अग्निशमन विभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. आग वाढत इंधनाच्या टाकीपर्यंत पोहोचल्यानं आग भडकली आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. हे वाचा - कोरोना काळातही कार खरेदीची मोठी संधी; Maruti Suzuki च्या गाड्यांवर बंपर ऑफर लॅम्बोर्गिनी युरूस ही लॅम्बोर्गिनीया जगप्रसिद्ध कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. या सुपरकार निर्मात्या कंपनीच्या एकूण विक्रीत या कारचा हिस्सा तब्बल 59.1 टक्के इतका आहे. कंपनीने जगभरात 4 हजार 391 युनिट्स लॅम्बोर्गिनी युरूस कारची विक्री केली आहे. gaadiwaadi.com च्या माहितीनुसार, 4 लीटर क्षमतेचे व्हीट्वीन-टर्बो इंजिन असलेली ही कार 650 पीएस पॉवर आणि 850 एनएम टॉर्क देते.
First published:

Tags: Car, Fire, Taiwan

पुढील बातम्या