नवी दिल्ली, 11 मे : फेसबुक (Facebook) हा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म युजर्सचा सर्वाधिक पसंतीचा प्लॅटफॉर्म मानला जातो. मित्र, सहकारी, नातेवाईक आदींच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मला आज जगभरात सर्वाधिक पसंती मिळत आहे. फेसबुक देखील प्लॅटफॉर्म अधिक युजर फ्रेंडली व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सोशल मिडीया जायंट फेसबुक लवकरच एक नवं प्रॉम्प्ट (Prompt) लॉन्च (Launch) करत आहे. या प्रॉम्प्टमुळे युजरला एखादा लेख फेसबुक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यापूर्वी एकदा वाचता येणार आहे. जास्त प्रमाणात शेअर झालेल्या बातम्या, लेख अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचावेत यासाठी कंपनीकडूम पॉप अप्स (POP-UPS) देण्यात येणार असल्याचं फेसबुकने सांगितलं. जर एखाद्या युजरने बातम्यांची लिंक ओपन न करताच शेअर करण्याचा प्रयत्न केला, तर फेसबुक तातडीनं ती लिंक इतरांसोबत शेअर करण्यापूर्वी ओपन करुन वाचण्यासाठी सांगेल. हा प्लॅटफॉर्म माहिती, योग्य चर्चेला चालना देण्यासाठी मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या रिड आर्टिकल फर्स्ट (Read Article First) या सारखाच आहे. कोरोना महामारी (Corona Pandemic) कालावधीत चुकीच्या माहितीचा प्रसार आणि बनावट बातम्यांमुळे फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या अनुषंगाने निर्माण होणारे गैरप्रकार रोखणं हे या नव्या फीचरचं उद्दिष्ट आहे.
(वाचा - तुमच्याबाबत Facebook कडे किती आणि काय माहिती आहे? तपासण्यासाठी करा हे काम )
कंपनीने शेअर माहितीनुसार, फेसबुकवरील प्राम्प्टद्वारे युजर्सला असं सांगण्यात आलं आहे, प्राम्प्टच्या म्हणण्यानुसार, न वाचता लेख किंवा आर्टिकल शेअर केल्यास युजर महत्वाच्या गोष्टी गमावू शकतात. या फीचरमुळे लेख न वाचता युजर पुढे पाठवू इच्छित असेल किंवा लेख वाचायचा असेल, तर त्यास ‘Continue Sharing’ किंवा ‘Open Article’ असे ऑप्शन्स मिळू शकतात.
Starting today, we’re testing a way to promote more informed sharing of news articles. If you go to share a news article link you haven’t opened, we’ll show a prompt encouraging you to open it and read it, before sharing it with others. pic.twitter.com/brlMnlg6Qg
— Meta Newsroom (@MetaNewsroom) May 10, 2021
रिड फर्स्ट आर्टीकल या प्रॉम्प्टमुळे किती फरक पडला याबाबत ट्विटरने (Twitter) अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. याबाबत कंपनीने म्हटलं आहे, की आक्षेपार्ह ट्विटचा संकेत मिळताच या प्रॉम्प्टमुळे सुमारे 34 टक्के लोकांना त्यांचा प्रारंभिक रिप्लाय सुधारण्यास सांगितलं गेलं. तसंच त्यांनी अजिबात रिप्लाय देऊ नये, असं देखील सांगता आलं. तसंच प्रॉम्प्टमुळे भविष्यात 11 टक्के कमी आक्षेपार्ह रिप्लाय मिळतील, असं देखील कंपनीने स्पष्ट केलं आहे.
(वाचा - या राज्यात दारुची ऑनलाईन डिलीव्हरी सुरू होताच ऑर्डर्सचा भडीमार,तासाभरात Appक्रॅश )
फेसबुकच्या नवीन प्रॉम्प्टची अँड्रॉईड स्मार्टफोनसह (Android Phones) सिस्टीमसाठी तपासणी केली जात आहे. हा प्रॉम्प्ट लगेच सर्व युजरसाठी उपलब्ध नसेल. परंतु, तो लवकरच लॉन्च केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.