नवी दिल्ली, 11 मे : देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki) या महिन्यात आपल्या सर्व कार्सवर घसघशीत सवलत (Discount) जाहीर केली आहे. कंपनीनं तब्बल 54 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली असून, यामध्ये रोख सवलतीसह (Cash Discount) एक्सचेंज बोनस (Exchange Bonus) आणि कॉर्पोरेट सवलतीचाही (Corporate Discount) समावेश आहे. मारुतीच्या 7 कार्सवर भरघोस सवलत मिळणार आहे, मात्र ही सवलत योजना मर्यादित काळासाठी आहे. वेगवेगळी राज्ये (States) आणि डीलरशिपनुसार (Dealerships) या सवलत योजनेत बदल होऊ शकतात. कार खरेदी करण्यासाठी मारुतीच्या अधिकृत डीलरशिपमध्ये जाऊन या सवलतीविषयी सविस्तर माहितीही घ्या.
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) -
मारुती सुझुकी स्विफ्ट या कारवर कंपनीनं रोख सवलत 30 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 20 हजार रुपये, तर कॉर्पोरेट सवलत 4हजार रुपयांपर्यंत अशी एकंदर 54 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) -
या कारवर कंपनीनं रोख सवलत 14 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये, तर कॉर्पोरेट सवलत 4हजार रुपयांपर्यंत अशी एकूण 33 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco) -
या कारवर कंपनीनं रोख सवलत 10 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये, तर कॉर्पोरेट सवलत 4 हजार रुपयांपर्यंत दिली आहे. या कारवर एकूण 29 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) -
या कारवर रोख सवलत 17 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये, कॉर्पोरेट डिस्काउंट 4 हजार रुपये अशी 36 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
वॅगन आर सीएनजी (Maruti Suzuki Wagon R CNG) -
या कारवर कंपनीनं रोख सवलत 13 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये, कॉर्पोरेट सवलत 4हजार रुपये दिली आहे. अशी एकूण 32 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) -
या कारवर कॅश डिस्काउंट 10 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 20 हजार रुपये, कॉर्पोरेट डिस्काउंट 4 हजार रुपयांपर्यंत देत एकूण 34 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली आहे.
वॅगन आर पेट्रोल (Maruti Suzuki Wagon R) -
कॅश डिस्काउंट 8 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये, तर कॉर्पोरेट डिस्काउंट 4 हजार रुपये आहे. एकूण 29 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात आला आहे.
मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire) -
या कारवर कंपनीनं रोख सवलत 8 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 20 हजार रुपये, तर कॉर्पोरेट सवलत 4हजार रुपयांपर्यंत अशी एकंदर 32 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे.
कोरोना साथीच्या काळात सुरक्षित प्रवासाकरता स्वतःची कार घेण्याची इच्छा असल्यास, या सुवर्णसंधीचा लाभ घेता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Maruti suzuki cars