Home /News /technology /

एका मेसेज आणि अभिनेत्रीच्या बँक खात्यातून चोरी झाले 1.48 लाख रुपये; अशी चूक चुकूनही करू नका

एका मेसेज आणि अभिनेत्रीच्या बँक खात्यातून चोरी झाले 1.48 लाख रुपये; अशी चूक चुकूनही करू नका

KYC च्या नावे होणाऱ्या फ्रॉडमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे. एका अभिनेत्रीच्या अकाउंटमधून 1.48 लाख रुपये चोरी करण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 1 मार्च : दिवसेंदिवस ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणात वाढ होत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरादरम्यान फ्रॉडस्टर्स पैसे चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. KYC च्या नावे होणाऱ्या फ्रॉडमध्ये मोठी (KYC Fraud) वाढ झाली आहे. नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे. एका अभिनेत्रीच्या अकाउंटमधून 1.48 लाख रुपये चोरी करण्यात आले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विले पार्ले येथे राहणाऱ्या 64 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्यासोबत तब्बल 1.48 लाख रुपयांचा फ्रॉड झाला आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कसा झाला फ्रॉड? अभिनेत्रीला एक टेक्स्ट मेसेज आला होता. हा मेसेज टेलिकॉम कंपनीकडून पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या मेसेजमध्ये त्यांना आपले पर्सनल डिटेल्स अपडेट करण्याचं सांगितलं होतं. पैसे काढण्यासाठी वापण्यात येणाऱ्या ATM कार्डचे डिटेल्स दिल्यानंतर फसवणूक झाल्याचं त्या म्हणाल्या. 26 फेब्रुवारी रोजी विले पार्ले पोलीस स्टेशनमध्ये याबाबत FIR दाखल करण्यात आली. त्यांना आपल्या पतीच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज आला. हा मेसेज एयरटेल (Airtel) कंपनीने पाठवला असल्याचं भासवण्यात आलं. मेसेजमध्ये त्यांच्या पतीने KYC Update केलं नसल्याचं सांगण्यात आलं. मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या नंबरवरुनच KYC अपडेट करावं. अन्यथा मोबाइल नंबर ब्लॉक केला जाईल असा मेसेज करण्यात आला होता.

  हे वाचा - Alert! फेक वेबसाइटपासून सावधान, सरकारचा इशारा

  या महिलेने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केला आणि समोरुन एयरटेलचे अधिकारी बोलत असल्याचं सांगत पुढील सूचना देण्यात आल्या. महिलेला मोबाइलवर क्विक सपोर्ट अॅप्लिकेशन डाउनलोड करुन इन्स्टॉल करण्यास सांगितलं. या App मुळे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या मोबाइलमध्ये अॅक्सेस करण्याची परवानगी दिली जाते. अभिनेत्रीने समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या. त्यानंतर KYC शुल्क म्हणून एका बँक खात्यात 10 रुपये पेमेंट करण्याचं सांगितलं. महिलेने आपले बँकिंग डिटेल्स टाकले. हे डिटेल्स फ्रॉडस्टर्स पाहू शकत होते. काही वेळाने या महिलेला काही संशय आला आणि त्या एयरटेल स्टोरमध्ये गेल्या. एयरटेलच्या स्टोरमध्ये त्यांना अशाप्रकारे कंपनीकडून कोणीही कधीही फोन करत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर महिलेने आपल्या बँकेत चौकशी केला असता, खात्यातून 1.48 लाख रुपये क्रेडिट कार्डच्या डिटेल्सद्वारे काढण्यात आले होते. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी कधीही कोणत्याही फोन कॉलवर तुमचे पर्सनल डिटेल्स देऊ नका. टेलिकॉम कंपनी, बँक, इतर शैक्षणिक संस्था किंवा एखाद्या अतिशय मोठ्या कंपनीकडून अशाप्रकारे बँकिंग किंवा पर्सनल डिटेल्स मागितल्यास शेअर करू नका. कारण कोणतीही कंपनी आपल्या ग्राहकांकडून फोनवर असे डिटेल्स विचारत नाही. बँक, टेलिकॉम कंपन्या कधीही आपल्या ग्राहकांचे डिटेल्स मिळवण्यासाठी कोणतंही App डाउनलोड करण्यास सांगत नाहीत. त्यामुळे कोणी पर्सनल, बँकिंग माहिती मागितल्या सावध व्हा आणि कोणतीही माहिती देऊ नका.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या