नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ई-श्रम कार्डची (E-Shram Card) सुविधा सुरू केली होती. या अंतर्गत काही राज्य सरकारकडून दर महिन्याला मजुरांच्या अकाउंटमध्ये 500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत ई-श्रम पोर्टलवर 25 कोटीहून अधिक मजुरांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. परंतु या योजनेच्या नावे आता फसवणुकीची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB ने ट्विट करत सतर्क केलं आहे. या लोकांना मिळतो ई-श्रम कार्डद्वारे फायदा - ई-श्रम पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम कार्डचा फायदा असंघटित क्षेत्रातील मजूर, भूमिहीन शेतकरी आणि 16 वर्षाहून अधिक विद्यार्थ्यांना मिळतो. या योजनेत सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री अपघाती विमा दिला जातो. त्याशिवाय काही राज्य सरकारांकडून दर महिन्याला 500 रुपये अकाउंटमध्ये दिले जातात.
हे वाचा - पर्सनल डेटा लीक करणाऱ्या Fake Websites कशा ओळखाल? पाहा सोपी पद्धत
फेक वेबसाइटबाबत PIB कडून अलर्ट - प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ट्विट करत लोकांना सतर्क केलं आहे. सायबर क्रिमिनल्सकडून ई-श्रम पोर्टलप्रमाणेच दिसणारी फेक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार असाल, तर ई-श्रमची अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वरच लॉगइन करा असं PIB कडून सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्येही ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता.
हे वाचा - Fake-बनावट सॉफ्टवेअरने सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच
ई-श्रम कार्डसाठी पेमेंट करावं लागत नाही - ई-श्रम पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम कार्ड फ्रीमध्ये बनवता येतं. यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. त्याशिवाय कोणी अनोळखी व्यक्ती ई-श्रम कार्डचे डिटेल्स, आधार कार्ड, बँक पासबुक अशा गोष्टी मागत असल्यास त्या देऊ नका.
ई-श्रम के आधिकारिक पोर्टल की नकल करने वाली फर्जी वेबसाइट्स से सावधान रहें
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) February 16, 2022
इस #PIBFacTree पर नजर डालें और ई-श्रम पोर्टल के बारे में अधिक जानकारी पाएं
🔗https://t.co/b0YDm4LYa8@LabourMinistry pic.twitter.com/cJlkIdoiSy
तसंच अनोळखी कॉलवरही ई-श्रम कार्डसंबंधी माहिती शेअर करण्याची गरज नाही. कारण सरकारकडून कोणत्याही विभागातून फोन करुन ई-श्रम कार्डबाबत माहिती मागितली जात नाही.