मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp डिलीट करायचंय मात्र डेटा गमावण्याची भीती? ही पद्धत वापरून सुरक्षित ठेवा सर्व माहिती

WhatsApp डिलीट करायचंय मात्र डेटा गमावण्याची भीती? ही पद्धत वापरून सुरक्षित ठेवा सर्व माहिती

Whatsapp सोडून, इतर पर्यायाकडे जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्याचा एक योग्य पर्याय आहे, ज्यामुळे युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत (Privacy Policy) सतत चर्चेत आहे. अनेकांनी या नव्या प्रायव्हसीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. अशात अनेक जण व्हॉट्सअप बंद करू इच्छितात, परंतु डेटा डिलीट (Whatsapp data) होण्याची युजर्सला भीतीही आहे. Whatsapp सोडून, इतर पर्यायाकडे जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्याचा एक योग्य पर्याय आहे, ज्यामुळे युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्याआधी Whatsapp डेटा डाउनलोड करा. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्याआधी चॅटचा बॅकअप घेऊ शकता.

- WhatsApp Chat एक्सपोर्ट करण्यासाठी WhatsApp -> Settings -> Chats -> Chat History -> Export chat या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- आता त्या कॉन्टॅक्ट नंबरवर टॅप करा, ज्याचे चॅट एक्सपोर्ट करायचे आहेत.

- इथे ‘Include मीडिया’हा पर्याय दिसेल, याचा अर्थ युजर्स चॅटशिवाय फाईल, फोटो, व्हिडीओ आणि इतर मीडिया बॅकअपही घेऊ शकतात.

- आता हे चॅट Google Drive किंवा Gmail ज्या स्टोरेज अ‍ॅपवर एक्सपोर्ट करायचे आहेत, त्याला सिलेक्ट करा.

(वाचा - बाबो! चुकीचं स्पेलिंग असलेल्या 'या' ट्विटची किंमत तब्बल 18 कोटी, काय आहे कारण...)

WhatsApp Account असं करा डिलीट -

- WhatsApp ओपन करुन तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.

- आता सेटिंग्स> अकाउंट> डिलीट माय अकाउंटवर जा

- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून डिलीट माय अकाउंटवर टॅप करावं लागेल. WhatsApp युजरला Account डिलीट करण्यासाठीच कारण विचारेल.

- लास्ट स्टेपमध्ये डिलीट माय अकाउंटवर टॅप करावं लागेल.

First published:

Tags: Whatsapp, Whatsapp chat