• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Aadhaar Card: तुमच्या आधारकार्डचा गैरवापर टाळायचा आहे? असा करा उपाय

Aadhaar Card: तुमच्या आधारकार्डचा गैरवापर टाळायचा आहे? असा करा उपाय

Aadhar Card: प्रत्येक व्यक्तीच्या आधारमध्ये, त्याच्याशी संबंधित बराच महत्वाचा डेटा असतो, ज्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत आधारचा चुकीचा वापर टाळला जाणे महत्वाचे आहे. आधारच्या आकडेवारीची गोपनीयता राखण्यासाठी केंद्र सरकार अनेक आवश्यक पावले उचलत आहे.

  • Share this:
नवी दिल्ली,14 मार्च : आधारकार्ड (Aadhar Card) हे सध्याचे सर्वांत महत्त्वाचे अधिकृत ओळखपत्र आहे. प्रत्येक व्यक्तीची अत्यंत महत्त्वाची माहिती त्याच्या आधारकार्डशी जोडलेली असते. त्यामुळं त्याचा गैरवापर होण्याची भीती असते. यासाठी आधारकार्ड सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आधारकार्डचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकार सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. आधारकार्ड सुरक्षित ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे ते लॉक (Lock) करणे. आधार लॉक करणं किंवा अनलॉक करणं म्हणजे नेमकं काय ? आधार लॉक करणं म्हणजे याचा 12 आकडी क्रमांक आणि त्याऐवजी असलेल्या 16 आकडी व्हर्च्युअल आयडीचा (Virtual ID) वापर कोणत्याही प्रकारच्या ऑथेन्टिकेशनसाठी (Authentication) करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीनं एकदा आधार लॉक केलं की त्याला यूआयडी, यूआयडी टोकन आदी बाबींसाठी ऑथेन्टिकेशन करता येणार नाही. यामध्ये बायोमेट्रिक, डेमोग्राफिक आणि ओटीपी आधारित ऑथेन्टिकेशनही करता येणार नाही. एखाद्याला आपला युनिक आयडी अनलॉक करायचा असेल तर त्याला रेसिडेंट पोर्टलवर जाऊन अनलॉक (Unlock) करता येईल. अनलॉकनंतर सर्व प्रकारच्या ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येतील. बायोमेट्रिक लॉक : आधारकार्डधारकांना बायोमेट्रिक लॉक (Biometric) करण्याचाही पर्याय आहे. बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करण्याच्या या सुविधेमुळं नागरिक आधार काही काळाकरिता आपल्या बायोमेट्रिक डेटा लॉक करतात आणि आवश्यकता असेल तेव्हा अनलॉक करतात. बायोमेट्रिक डेटा सुरक्षित राहावा, हाच या सुविधेमागचा हेतू आहे. बायोमेट्रिक लॉकमुळं फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांशी जोडलेल्या डेटाचा गैरवापर करता येत नाही. आधार लॉक कसे करावे? युनिक आयडेन्टीफिकेशन नंबर अर्थात आधार नंबर लॉक करण्यासाठी त्या व्यक्तीकडं 16 अंकी व्हर्च्युअल आयडी असणं आवश्यक आहे. हा आयडी नसेल तर एसएमएसच्या माध्यमातून तो जनरेट करता येतो. यासाठी मेसेजमध्ये जीव्हीआयडी (GVID) लिहून स्पेस देऊन शेवटचे चार किंवा आठ आकडे लिहिणे आवश्यक आहे. हा मेसेज 1947 या क्रमांकावर पाठवून द्यावा. उदाहरणार्थ : GVID 1234 आधार लॉक किंवा अनलॉक करण्याची प्रक्रिया कशी असते? रेसिडेंट पोर्टलवर ‘माय आधार’ (My Aadhar) विभागातील आधार सर्व्हिसेसमध्ये (Aadhar Services) 'लॉक अँड अनलॉक'वर क्लिक करा. त्यामध्ये यूआयडी लॉक रेडिओ बटणावर (UID Lock Radio Button) क्लिक करा आणि आधार क्रमांक भरा. यानंतर, पूर्ण नाव, पिनकोड आणि अद्ययावत माहिती भरल्यानंतर सिक्युरिटी कोड भरावा लागेल. यानंतर ओटीपीसाठी क्लिक करा किंवा टीओटीपी (TOTP) सिलेक्ट करून सबमिटवर क्लिक करा. युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर अर्थात आधार नंबर अनलॉक करण्यासाठी 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नंबर असणं आवश्यक आहे. हा 16 अंकी व्हीआयडी क्रमांक विसरल्यास, तो परतही मिळवता येऊ शकतो. त्यासाठी आरव्हीआयडी (RVID) लिहून स्पेस द्यावी आणि त्यापुढं आधार क्रमांकाचे शेवटचे 4 किंवा 8 अंक लिहावेत आणि ते 1947 क्रमांकावर पाठवावे. उदाहरणः आरव्हीआयडी 1234  हे वाचा -    7th Pay Commission: खुशखबर! एक एप्रिलपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नवीन व्हर्च्युअल आयडी नंबर मिळाल्यानंतर अनलॉक रेडिओ बटणावर क्लिक करा आणि नवीन व्हीआयडी भरा. यानंतर, सुरक्षा कोड भरा आणि ओटीपी मागवा किंवा टीओटीपी सिलेक्ट करा आणि 'सबमिट'वर क्लिक करा. तुमचं आधार कार्ड अनलॉक होईल. आधार बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक कसं करावं? यासाठी रेसिडेंट पोर्टलवर ‘माय आधार’ (My Aadhar) विभागातील आधार सर्व्हिसेसमध्ये (Aadhar Service) 'लॉक अँड अनलॉक बायोमेट्रिक्स'वर (Lock and Unlock Biometrics) क्लिक करा. नंतर आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी नंबर (VID) भरा. कॅप्चा कोड भरल्यानंतर मोबाइलवर ओटीपी (OTP) मागवा. ओटीपी भरल्यानंतर सबमिट करा. यानंतर तुमचे बायोमेट्रिक लॉक होईल. अनलॉक करण्यासाठीही हीच प्रक्रिया वापरा. Link: https://hindi.news18.com/news/business/beware-of-aadhaar-card-misuse-know-how-to-protect-your-aadhaar-card-from-any-kind-of-misuse-samp-3509705.html Translation by Prachi
First published: