जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smart Helmet आता वाचवणार तुमचे प्राण आणि करणार पेट्रोलचीही बचत

Smart Helmet आता वाचवणार तुमचे प्राण आणि करणार पेट्रोलचीही बचत

Smart Helmet

Smart Helmet

हेल्मेट पेट्रोलचीही बचत (Save Petrol) करण्याचं काम करणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : रस्त्यावर दुचाकीस्वाराचा (Bike Rider) अपघात झाला, तर त्यात जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी वस्तू म्हणून आतापर्यंत हेल्मेटची (Helmet) ओळख होती; पण आता हेल्मेट पेट्रोलचीही बचत (Save Petrol) करण्याचं काम करणार आहे. वाराणसीतील अशोका इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी एका स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेटची (Smart Traffic Helmet) निर्मिती केली आहे. हे हेल्मेट चालकाचा जीव आणि पेट्रोल या दोन्ही गोष्टी वाचवणार आहे. एवढंच नव्हे, तर अपघात घडल्यास अँब्युलन्स (Ambulance) आणि पोलिसांना (Police) सूचना देण्याचंही काम हे हेल्मेट करणार आहे. स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेट घालून एखादी व्यक्ती बाइक चालवत असेल आणि रेड सिग्नल (Red Signal) लागल्यामुळे बाइक उभी केली असेल, तर बाइकचं इंजिन (Engine) आपोआप बंद होईल. सिग्नल हिरवा झाल्यानंतर बाइकचं इंजिन आपोआप सुरू होईल. बाइक सिग्नलपासून 50 मीटर अंतरापर्यंतच्या टप्प्यात उभी असेल तरच इंजिन आपोआप बंद-चालू होणार आहे. अशोका इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हेल्मेटमध्ये सेन्सर (Sensor) बसवलेले आहेत. त्यामुळे हे हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीचा रस्त्यावर अपघात झाल्यास अँब्युलन्स, पोलिस आणि कुटुंबीयांना आपोआप मेसेजद्वारे त्या व्यक्तीच्या लोकशनची माहिती पाठवली जाईल. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीपर्यंत मदत तातडीने पोहोचू शकेल.

  हे देखील वाचा -  ऑनलाईन फ्रॉडवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना

 हे हेल्मेट रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटरवर (Radio Frequency Transmitter) काम करतं. या स्मार्ट हेल्मेटच्या यंत्रणेत दोन ट्रान्स्मीटर आणि एक रिसिव्हर आहे. त्यापैकी रिसिव्हर बाइकवर बसवला जातो. एक ट्रान्स्मीटर हेल्मेटमध्ये बसवण्यात आलेला आहे. हेल्मेट परिधान केल्यानंतर तो अ‍ॅक्टिव्हेट होतो. तसंच गाडीवरचा रिसिव्हरही सुरू होतो आणि चालकाने हेल्मेट घातल्यानंतर गाडी सुरू होते. दुसरा ट्रान्स्मीटर सिग्नल सिस्टीमच्या जवळ बसवलेला असेल. रेड सिग्नलच्या ट्रान्स्मीटरच्या संपर्कात ही बाइक आली, की त्यातल्या रिसिव्हरला ट्रान्स्मीटरचे सिग्नल मिळतात. त्यामुळे तो बंद होतो आणि इंजिन बंद पडतं. सिग्नल हिरवा झाला, की याच तत्त्वाने इंजिन पुन्हा सुरू होतं. सध्या याची रेंज 50 मीटरपर्यंत असून, ती आणखीही वाढवता येऊ शकते. Link : https://hindi.news18.com/news/auto/smart-helmet-will-save-lives-and-petrol-know-which-technology-will-work-on-helmet-3466539.html

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात