जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ऑनलाईन फ्रॉडवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना

ऑनलाईन फ्रॉडवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना

ऑनलाईन फ्रॉडवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना

देशातील ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : देशात सतत ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. देशातील ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात येणार आहे. डिजिटल पद्धतीने वाढणारे व्यवसाय आणि यातील व्यवहारावेळी होणाऱ्या फसवणूक, अनपेक्षित कॉल टाळण्यासाठी सरकारने डिजिटल इंटेलिजेंस युनिट (Digital Intelligence Unit) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी टेलिकॉम मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकार लवकरच यासाठी टेलिकॉम कंपन्या आणि टेलीमार्केटरसह बैठक करणार आहे. पोर्टल बनवले जाणार - फ्रॉड मॅनेजमेंट आणि कंज्यूमर प्रोटेक्शनसाठी पोर्टल बनवले जाणार आहेत. जाच्या माध्यमातून ग्राहक टेलिकॉम कंपन्यांना नको असलेले कॉल, एसएमएस आणि आर्थिक फसवणूकबाबत तक्रार करू शकतील. अशाप्रकारे ग्राहकांना नको असलेले कमर्शियल कॉल किंवा एसएमएस पाठवणाऱ्या कंपन्यांवर दंडाची तरतूद केली जात आहे. सरकारकडून तयार करण्यात येणारं युनिट आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांवर वेळेत निर्णय देईल. या बैठकीत डिजिटल व्यवहारात सुरक्षेबाबत सर्वाधिक जोर देण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्यांना कोणाकडूनही पैसे हिसकावले देऊ दिले जाणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार साधनांचा वापर झपाट्याने वाढला असल्याचं रवीशंकर प्रसाद म्हणाले. अशा फ्रॉड लोकांमुळे सामान्य माणसाने कष्टाने कमावलेला पैसा हडपला जात आहे. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात