नवी दिल्ली, 2 मार्च : गाडी चालवताना वाहतुकीचे नियम (Traffic Rule) पाळणं अत्यावश्यक असतं. त्यापैकी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट असून गाडी चालवताना ते जवळ असणं हा नियम आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवत असाल, तर ट्रॅफिक पोलीस तुमचं चालान (Challan) कापू शकतात. अनेकदा घाईत कधी बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरलं जातं. कधी ते फाटलं असेल किंवा इतर कारणांमुळे जवळ नसल्यास मोठी समस्या येते. पण एका ट्रिकने ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसेल, तरी ट्रॅफिक पोलीस तुमचं चालान कापू शकत नाही. ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी ही ट्रिक अतिशय फायदेशीर ठरू शकते. ड्रायव्हिंग लायसन्स फिजीकली जवळ न ठेवता तुम्ही अधिकृत App द्वारे ते ऑनलाइन रुपात जवळ ठेवू शकता. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स विरसल्याची, फाटल्याची कोणतीही चिंता राहणार नाही. तसंच ट्रॅफिक पोलिसांना सरकारी अधिकृत App मधील हे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं कायदेशीर आहे. ट्रॅफिक पोलिसांना चालक डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (mParivahan) मोबाइल App वर डिजीटल स्वरुपात वाहतुकीची कागदपत्रं दाखवू शकतात. DigiLocker मध्ये डॉक्युमेंट सेव्ह ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत डॉक्युमेंटची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज नाही.
हे वाचा - Smartphone हरवला किंवा चोरी झाला?या सरकारी वेबसाइटच्या मदतीने करा महत्त्वाचं काम
DigiLocker किंवा mParivahan मोबाइल App वर डिजीटल स्वरुपात ठेवलेलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत वैध कागदपत्रं आहेत. या App मधील सॉफ्ट कॉपी वैध आहे. परंतु ड्रायव्हिंग लायसन्सची आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी या App शिवाय इतर कोणत्याही स्वरुपात स्वीकारली जाणार नाही. DigiLocker हे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारख्या डॉक्युमेंट्सला सेव्ह करुन सुरक्षित ठेवण्याचा चांगला पर्याय आहे. हे App इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लाँच केलं आहे.
हे वाचा - एका मेसेज आणि अभिनेत्रीच्या बँक खात्यातून चोरी झाले 1.48 लाख; अशी चूक करू नका
डिजीलॉकर आधार कार्ड आणि फोन नंबरशीही लिंक होतं. यात डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी PDF, JPEG किंवा PNG फॉर्मेटमध्ये अपलोड करुन सेव्ह करता येते.