मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77 व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप

सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77 व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप

77 वर्षांच्या उर्मिला जमनादास आशेर (Urmila Jamanadas Asher) यांचं सगळं आयुष्यच संघर्षमय आहे, त्यामुळेच त्यांच्या या वयातील धडाडीचं कौतुक वाटतं.

77 वर्षांच्या उर्मिला जमनादास आशेर (Urmila Jamanadas Asher) यांचं सगळं आयुष्यच संघर्षमय आहे, त्यामुळेच त्यांच्या या वयातील धडाडीचं कौतुक वाटतं.

77 वर्षांच्या उर्मिला जमनादास आशेर (Urmila Jamanadas Asher) यांचं सगळं आयुष्यच संघर्षमय आहे, त्यामुळेच त्यांच्या या वयातील धडाडीचं कौतुक वाटतं.

    मुंबई, 28 एप्रिल : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असं म्हणतात म्हणजेच प्रयत्न केले तर काहीही शक्य होतं. मनात जिद्द असेल तर कधीही काहीही अवघड नसतं, याचंच उत्तम उदाहरण आहेत मुंबईतील (Mumbai) 77 वर्षांच्या उर्मिला जमनादास आशेर (Urmila Jamanadas Asher). आयुष्यात अनेक दुःखं सोसलेल्या या आजीबाईंनी या वयातही आपली चिकाटी वृत्ती सोडलेली नाही. या वयात त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द दाखवली. नैराश्याचा सामना करणाऱ्या तरुण नातवालाही प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढलं. आज त्यांचे स्वतःचे ‘गुज्जू बेन ना नस्ता’ (Gujju Ben na Nasta) नावाचं रेस्टॉरंट असून अनेक लोक त्यांच्या हाताच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची आस्वाद घेण्यासाठी इथं हजेरी लावतात किंवा ऑर्डर करून घरपोच मागवतात. त्यांची खास गुजराती पद्धतीची लोणची, खाकरा, चिप्स, कुकीज अशी विविध उत्पादने मुंबईबाहेरही विक्रीसाठी पाठवली जातात.

    77 वर्षांच्या उर्मिलाबेन यांचा दिवस रोज पहाटे 5.30 वाजता सुरू होतो. सून राजश्री आणि नातू हर्षसाठी त्या चहा आणि नाश्ता बनवतात. त्यानंतर वर्तमानपत्र वाचतात आणि मग त्या आपल्या ‘गुज्जू बेन ना नस्ता’ या रेस्टॉरंटमध्ये मुंबईकरांनी दिलेल्या फूड ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्याच्या कामाकडे वळतात. या सर्व उत्पादनांची पाककृती उर्मिला बनवतात. अन्यदोन-तीन जणांच्या मदतीने नाश्त्यासाठीचे खास गुजराती पदार्थ तयार करून घेतात. याचं मार्केटिंग आणि अन्य व्यवस्थापन त्यांचा नातू हर्ष सांभाळतो.

    उर्मिलाबेन यांचे सगळं आयुष्यच संघर्षमय आहे, त्यामुळेच त्यांच्या या वयातील धडाडीचे कौतुक वाटतं.

    हे वाचा - 65व्या वर्षी व्यावसायिक बनण्याचं धैर्य दाखवणारे Maruti Suzukiचे जगदीश खट्टर

    उर्मिलाबेन यांच्या पहिल्या मुलीचा अडीच वर्षांची असताना मृत्यू झाला. तर काही वर्षानंतर त्यांच्या एका मुलाचा ब्रेन ट्यूमरनं तर एका मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. उर्मिला जमनादास यांच्याकडे एकच आशेचा किरण होता तो म्हणजे त्यांचा नातू हर्ष. हर्ष यानं 2012 मध्ये एमबीए पूर्ण केलं आणि त्यानं पर्यटन क्षेत्रात ओमान मंत्रालयाबरोबर काम सुरू केलं. वाणिज्य दूतावास आणि व्यापारी यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यानं 2014 मध्ये ही नोकरी सोडली. सगळं सुरळीत सुरू असताना 2019 मध्ये झालेल्या एका अपघातात हर्ष याचा वरचा ओठ गेला. यामुळं हर्ष यानं घराबाहेर पडणं बंद केलं.आपण घरातील आर्थिक मदतदेखील करू शकत नाही, आपलं व्यंग यामुळे त्याला नैराश्य आलं. एकुलता एक आधार असणाऱ्या तरुण नातवाची ही अवस्था पाहून दुसरी एखादी आजी असती तर कदाचित स्वतःही खचून गेली असती. पण उर्मिला हरल्या नाहीत. त्यांनी हर्ष याची हिंमत वाढवली. तू शिकलेला आहेस, स्वतःवर विश्वास ठेव असं सांगत त्यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला.

    हे वाचा - या कंपनीत केला होता Elon Musk यांनी नोकरीसाठी अर्ज; नोकरी नाही मिळाली म्हणून...

    गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये हर्षनंआपल्या आजीसोबत बराच काळ घालवला. त्या वेळी त्यानं पाहिलं की आपली आजी खूप आवडीनं गुजराती पद्धतीची लोणची बनवते. त्यानं आजीनं बनवलेल्या लोणच्यांचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. उर्मिलाबेन यांच्या लोणच्यांची मागणी वाढू लागली. मग त्यांनी आणखी काही उत्पादनं बनवण्यास सुरुवात केली. लोणच्याबरोबर कोरडे आणि गरम स्नॅक्स उपलब्ध केले. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी ‘गुज्जू बेन ना नास्ता’ नावाचं स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं. ‘गुजराती बहिणीच्या हातचा नाश्ता असा याचा अर्थ आहे.

    ‘इथं आम्ही माझ्या दादीनं म्हणजे आजीनं बनवलेली सर्व उत्पादनं ठेवतो. लोक इथं येऊन उत्पादनं खरेदी करतात किंवा ऑनलाइन ऑर्डर करतात. नाश्त्याचे ताजे पदार्थ मात्र सध्या फक्त मुंबईतच घरपोच दिले जातात, असं हर्ष याने सांगितलं.

    First published:

    Tags: Career, Mumbai, Old woman, Start business