नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : Flipkart वर Flipkart Big Billion Days सेल सुरू होणार आहे. या सेलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 7 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. सेलमध्ये अॅक्सिस बँक, ICICI बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये Paytm वॉलेट आणि UPI ट्रान्झेक्शनद्वारे पेमेंट केल्यास एश्योर्ड कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निशिंग प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिल्स आहेत. या सेलमध्ये स्मार्ट अपग्रेड ऑफरअंतर्गत युजर्स केवळ 70 टक्के देऊन आपल्या स्मार्टफोन अपग्रेड करू शकतात. सेलमध्ये 299 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत कंप्लिट मोबाईल प्रोटेक्शन मिळत आहे. त्याशिवाय सेलमध्ये शून्य टक्के इंटरेस्ट आणि प्रोसेसिंग फीसवर नो-कॉस्ट EMI चा फायदा मिळतो आहे. तसंच कोणत्याही चांगल्या स्थितीत असलेल्या फोनच्या एक्सचेंजवर कमीत-कमी 2000 रुपयांची सूट मिळते आहे.
जानेवारी 2022 पासून बदलणार Online Payment ची पद्धत, अशी असणार नवी प्रोसेस
Flipkart 27 सप्टेंबर रोजी Apple Smartphone वर डिस्काउंटचा खुलासा होईल. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान Realme, Oppo, POCO, Vivo आणि Motorola चे स्मार्टफोन लाँच होतील. तसंच फ्लिपकार्ट सेलमध्ये टीव्ही आणि इतर अप्लायंसेजवर 80 टक्क्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स अँड अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
Renault 10 years celebration:आता खरेदी करा Car आणि 2022 मध्ये द्या पैसे,पाहा ऑफर
Smartphone Offers - Flipkart Big Billion Days सेलमध्ये Moto G60 स्मार्टफोन केवळ 15,999 रुपयांत मिळेल. तर Motorola edge 20 5G स्मार्टफोन 29,999 रुपयात खरेदी करता येईल. Motorola edge 20 fusion 5G 19,999 रुपये आणि Moto G40 Fusion 12,999 रुपयांत खरेदी करता येईल. Infinix Hot 10S फोन 9,499 रुपये, तर Poco X3 Pro स्मार्टफोन 16,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.