मराठी बातम्या /बातम्या /मनी /Flipkart कडून कर्जाची नवी योजना, किराणा दुकानदारांसाठी 2 लाखांपर्यंतचं इंटरेस्ट फ्री Loan; जाणून घ्या प्रक्रिया

Flipkart कडून कर्जाची नवी योजना, किराणा दुकानदारांसाठी 2 लाखांपर्यंतचं इंटरेस्ट फ्री Loan; जाणून घ्या प्रक्रिया

यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

यासाठी सर्वात आधी Flipkart App तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर App मध्ये अकाउंट लॉगइन करावं लागेल.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) एक नवीन कर्ज योजना (Loan Scheme) जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट:  जागतिक कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) संकटानं देशातील अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अशा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत करता यावा यासाठी विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. सरकारनेही छोट्या व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) किराणा दुकानदारांच्या मदतीकरता एक नवीन कर्ज योजना (Loan Scheme) जाहीर केली आहे.

देशातील स्थानिक किराणा दुकानदारांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या (IDFC First Bank) भागीदारीत ईझी क्रेडीट (Easy Credit) नावाचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 14 दिवसांपर्यंतच्या कालावधी अंतर्गत 5 हजार ते 2 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज (Interest Free Loan) दिलं जाणार आहे. या योजनेद्वारे शून्य प्रक्रिया शुल्कासह कर्ज मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना फ्लिपकार्ट होलसेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन (Adarsha Menon)म्हणाले की, किराणा आणि किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसाय वाढीला चालना देणं हा कंपनीचा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. आमच्या या नवीन कर्ज योजनेमुळे देशातील किराणा दुकानदारांना स्थानिक आव्हानांना तोंड देणं शक्य होईल.

LIC Policy: बंद पडलेली जुनी पॉलिसी पुन्हा करा सुरू, एलआयसी देत आहे संधी; वाचा सविस्तर

फ्लिपकार्ट ही देशातील एक लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी (E-Commerce Company) असून, तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील (USA) सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांपैकी एक असलेल्या वॉलमार्टने (Walmart) फ्लिपकार्टमधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. कर्ज पुरवठ्याच्या या योजनेत वॉलमार्टचाही सहभाग आहे. फ्लिपकार्टचे देशभरात 35 कोटींहून अधिक नोंदणीकृत ग्राहक असून, तीन लाखांहून अधिक विक्रेते जोडले गेले आहेत. यातील 60 टक्के विक्रेते टियर-2 आणि लहान शहरांतील आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून ऊसाच्या FRP मध्ये वाढ, असा होणार फायदा

 कोरोना साथीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग सेवेला अधिक प्रोत्साहन मिळाले. दुकाने बंद असल्यानं तसंच बाहेर पडण्यावर निर्बंध असल्यानं घरपोच सामान मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांना माल पुरवठा करण्यासाठी अधिकाधिक विक्रेत्यांची गरज भासत आहे.

फ्लिपकार्टलाही वाढत्या ग्राहकवर्गाची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसाय विस्तारासाठी विक्रेत्यांची आवश्यकता आहे. त्याकरता छोट्या व्यावसायिकांना भांडवलासाठी मदत करण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. याचा फायदा देशातील स्थानिक पातळीवरील दुकानदारांना होणार आहे. कारण त्यांना ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांचा व्यवसाय वाढण्यास याचा मोठा फायदा होणार आहे. तर फ्लिपकार्टला स्थानिक पातळीवरील खासीयती, उत्तम दर्जाचे पदार्थ, वस्तू यांचा पुरवठा ग्राहकांना करणं शक्य होणार आहे. त्यामुळे ही कर्ज योजना दोन्ही बाजूंसाठी लाभदायी ठरणार आहे.

First published:

Tags: Flipkart, Loan