कोल्हापूर, 13 ऑक्टोबर: अवघ्या महाराष्ट्राची शान असलेली कोल्हापुरी चप्पल आता अॅमेझॉनवरही उपलब्ध आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली. कोल्हापुरी चपलेला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन प्रोडक्ट विक्री या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. आता बचत गटातील महिलांनी, तसंच कारागिरांनी बनवलेल्या कोल्हापुरी चपलांना आंतराराष्ट्रीय बाजारपेठेची दारं उघडली आहेत. ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण करुन त्यांचं जीवनमान उंचावणे हा या मोहिमेचा मुळ उद्देश आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत, योजना राबवण्यात येत आहे. ‘उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ असं या योजनेचं नाव आहे.
कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) October 12, 2020
माझ्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ..उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची उत्पादने अमेझॉन डिजीटल बाजारपेठेत
देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध pic.twitter.com/mWtVwD2Tfv
कोल्हापूरी चपलेसोबत, गुळ, काकवी, दागिने, मध, विविध प्रकारचे मसाले, अशा छोट्या उद्योगांनाही ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.