Home /News /technology /

Jio's Got Talent : 10 सेकदांच्या व्हिडिओमुळे होऊ शकते 'थायलंड'वारी

Jio's Got Talent : 10 सेकदांच्या व्हिडिओमुळे होऊ शकते 'थायलंड'वारी

आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओकडून नेहमीच नवनवीन संकल्पना राबवल्या जातात. स्नॅपचॅटसोबत मिळून जिओने असच एक चॅलेंज आपल्या ग्राहकांना दिलं आहे. हे चॅलेंज जर तुम्ही जिंकलं तर एक सुवर्णसंधी जिओच्या ग्राहकांना मिळू शकते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : सध्या सोशल मीडीयावर आपल्या गाण्याचं, डान्सचं किंवा इतर काही टॅलेंट दाखवणारे व्हिडिओ अनेक जण अपलोड करत असतात. सोशल मिडीयावर मिळणारी प्रसिद्धी काही प्रमाणात मानाची देखील मानण्यात येते. पण जर याच टॅलेंटमुळे जर परदेशवारी करता आली तर त्याहुन भन्नाट काहीच नाही. मग तुम्ही जर जिओ युजर आहात आणि तुम्हाला स्नॅपचॅटचे शेकडो लेन्स क्रिएटीव्ह पद्धतीने वापरता येत असतील, तर चक्क थायलंडला जायची संधी तुम्हाला मिळू शकते. जिओ आणि स्नॅपचॅट मिळून आपल्या ग्राहकांना एक चॅलेंज देणार आहेत. ‘Jio's Got Talent’ असं या चॅलेंजचं नाव आहे. जर ग्राहकांनी हे चॅलेंज जिंकलं तर त्यांना थेट थायलंडवारी करता येईल. नेमकं काय आहे चॅलेंज? मित्रमैत्रिणींसोबत अनेत स्नॅप्स आपण शेअर करत असतो. स्नॅप स्टोरी देखील अनेकदा अपलोड करतो. या चॅलेंजमध्ये देखील असंच काहीसं करायचं आहे. या चॅलेंजसाठी स्नॅपचॅट आणि जिओने मिळून स्नॅपचॅटवर ‘Jio's Got Talent’ची एक लेन्स बनवली आहे. ज्यामध्ये माईक, टोपी, हेडफोन्स, लाईट रिंग्स यांसारख्या अनेक प्रॉप्सचा वापर करता येणार आहे. या लेन्सचा वापर करुन स्नॅपचॅट युजर्सना 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे. यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ ‘Our Story’मध्ये अपलोड करताना जिओ आणि स्नॅपचॅटला त्यांच्या युजरनेमनुसार टॅग करायचं आहे. जितका क्रिएटीव्ह व्हिडिओ तितकी ‘थायलंड ट्रीप’ जिंकण्याची संधी अधिक हे साधं गमक आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत हे चॅलेंज सुरु असणार आहे. पहिल्या 2 विजेत्यांना थायलंडला जाण्याची संधी मिळणार आहे तर 2 उपविजेत्यांना महिनाभराचा रिचार्ज बक्षीस म्हणून मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा ‘फ्री ऑफ कॉस्ट’ असल्याने अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळणार आहे. अन्य बातम्या ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्याआधी हे वाचा! IRCTC ने दिलाय ऑनलाईन फ्रॉडचा Alert Vodafone ची प्री-पेड ग्राहकांना ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग जुने iPhone धोकादायक, तुम्हीही वापरत असाल तर काळजी घ्या
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या