Home /News /technology /

Vodafone ची खास ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

Vodafone ची खास ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

डिसेंबर महिन्यात टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर Vodafone कंपनीने प्री-पेड ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे.

    व्होडाफोन इंडियाने डिसेंबर महिन्यात टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता कंपनीने प्री-पेड प्लॅनची ऑफर दिली आहे. व्होडाफोन आयडियाने 558 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. त्यानंतर आता 269 रुपयांचा नवा प्री पेड प्लॅन कंपनीने दिला आहे. व्होडाफोनच्या 269 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 4 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय 600 मेसेजही मिळतील. यात 56 दिवसांची मुदत असेल. मात्र ही सेवा सध्या काही सर्कलमध्येच उपलब्ध असणार आहे. यामध्ये सर्व नेटर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. तसेच 499 रुपयांचं व्होडाफोन प्ले अॅपचं सबस्क्रिप्शनसुद्धा मोफत मिळेल. फक्त 1 रुपयात एक जीबी डेटा, जिओला टक्कर देतेय 'ही' कंपनी कंपनीने या प्लॅनशिवाय आणखी दोन प्लॅन लाँच केले आहेत. यात 558 आणि 398 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळणार आहेत. Vodafone चा खास बजेट प्लान, 200 रुपयांत मिळणार सर्व काही हातात 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. याशिवाय 999 रुपयांचे झी5 चे सबस्क्रिप्शनही मोफत मिळेल. याची मुदत 56 दिवसांसाठी असणार आहे. सध्या हा प्लॅन फक्त मध्यप्रदेशात उपलब्ध आहे. Jioची भन्नाट ऑफर, 129 रुपयांत 2GB डेटासह मिळणार अनेक फायदे
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Vodafone

    पुढील बातम्या