नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणत असतं. जिओच्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सला युजर्सची पसंतीही मिळताना दिसते. नुकतंच जिओने आपल्या काही निवडक प्रीपेड प्लॅन्सवर कॅशबॅक देण्यास सुरुवात केली आहे. Jio ने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.
Jio च्या या रिचार्जवर कॅशबॅक -
Jio 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपयांच्या तीन प्रीपेड प्लॅन्सवर ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक देत आहे. या 20 टक्के कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी युजरला MyJio App किंवा जिओ डॉट कॉमवर जावं लागेल. हा कॅशबॅक आपोआप युजरच्या जिओ अकाउंटमध्ये पोहोचेल, त्यानंतर युजर्स हवं तेव्हा ही रक्कम पुढील रिचार्जसाठी वापरू शकतात.
Jio 249 प्लॅन -
28 दिवसांची वॅलिडिटी असलेला जिओचा 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा, दररोज 100 SMS,अनलिमिटेड कॉलिंग आणि सर्व जिओ Apps च्या सब्सक्रिप्शनची सुविधा मिळेल. जर तुमचा दिवसाचा डेटा संपल्यास, इंटरनेट स्पीड कमी करुन 64Kbps होईल. या प्रीपेड प्लॅनमध्ये 20 टक्के कॅशबॅक मिळेल.
555 Recharge Plan -
जिओच्या 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि सर्व Jio Apps चं सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनची वॅलिडिटी 84 दिवसांची असून यातही 20 टक्के कॅशबॅक मिळतो.
599 रुपये प्लॅन -
जिओच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 119 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 84 दिवस चालणाऱ्या या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा, सर्व Jio Apps चं सब्सक्रिप्शन, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग बेनिफिट मिळतो.
Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन -
JioPhone वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या व्यतिरिक्त, अमर्यादित कॉलिंग सुविधा, दररोज 50 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio News, JioSecurity आणि JioCloud सारख्या Apps चा अॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Reliance jio postpaid