मुंबई, 19 मे : Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅन्ससह पोस्टपेड प्लॅन्सही ऑफर करतं. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स असतात. अशीच एक फॅमिली प्लॅन ऑफर आहे. ही ऑफर जिओ पोस्टपेड युजर्सला मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. कॉल आणि डेटासह युजर्सला SMS बेनिफिट्स मिळतात.
जिओ 999 पोस्टपेड प्लॅन -
या प्लॅनमध्ये युजर्स तीन अॅडिशनल सिम कार्ड्स जोडू शकतात. Jio 999 पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. हा प्लॅन दररोज 100 SMS आणि 200 GB डेटासह येतो. डेटा लिमीट संपल्यानंतर युजर्सला 10 रुपये प्रति जीबीच्या रेटने डेटा मिळतो. याची वॅलिडिटी बिलिंग सायकलप्रमाणे असते.
या जिओ प्लॅनमध्ये Netflix, Amazon आणि Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शनही ऑफर केलं जातं. युजर्सला एका वर्षासाठी Amazon Prime Video चं सब्सक्रिप्शन मिळेल. तसंच युजर्सला JioTV, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची सुविधा मिळेल. हा प्लॅन 500GB पर्यंतच्या डेटा रोलओव्हरसह येतो.
Jio 799 प्लॅन -
या प्लॅनमध्ये युजर्स दोन एक्स्ट्रा सिम कार्ड जोडू शकतात. हादेखील एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 799 रुपये आणि याची वॅलिडिटी बिलिंग सायकलप्रमाणे असेल. या प्लॅनमध्ये युजर्सला 150GB डेटा आणि 200GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर मिळतो.
युजर्सला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS बेनिफिट मिळेल. या प्लॅनमध्येही युजर्सला Netflix, Amazon आणि Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळतं. त्याशिवाय युजर्स Jio TV, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लासच्या सर्विसेसही वापरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.