मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio चा सर्वात स्वस्त Recharge Plan; 10 रुपयांत मिळेल अनलिमिटेड वॅलिडिटी आणि बरंच काही...

Jio चा सर्वात स्वस्त Recharge Plan; 10 रुपयांत मिळेल अनलिमिटेड वॅलिडिटी आणि बरंच काही...

जिओ आपल्या ग्राहकांसाठी टॉप-अप व्हाउचर ऑफर करतं. या व्हाउचर्सची सुरुवात 10 रुपयांपासून सुरू होते. सर्वात स्वस्त रिचार्जमध्ये कंपनी 10 रुपयांचा टॉप-अप देते.

जिओ आपल्या ग्राहकांसाठी टॉप-अप व्हाउचर ऑफर करतं. या व्हाउचर्सची सुरुवात 10 रुपयांपासून सुरू होते. सर्वात स्वस्त रिचार्जमध्ये कंपनी 10 रुपयांचा टॉप-अप देते.

जिओ आपल्या ग्राहकांसाठी टॉप-अप व्हाउचर ऑफर करतं. या व्हाउचर्सची सुरुवात 10 रुपयांपासून सुरू होते. सर्वात स्वस्त रिचार्जमध्ये कंपनी 10 रुपयांचा टॉप-अप देते.

नवी दिल्ली, 29 मार्च : अनेक टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन (Jio Mobile Recharge Plan) लाँच करत असतात. परंतु अल्पावधीत रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील नंबर वन प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी ठरली आहे. जिओचे परवडणारे रिचार्ज प्लॅन हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. Jio चे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत. कमी किमतीत चांगल्या ऑफर्स, क्रिकेट प्लॅन्स, टॉप-अप, नो डेटा लिमिट असे अनेक पर्याय मिळतात.

Jio भारतीय टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी टॉप-अप व्हाउचर ऑफर करतं. या व्हाउचर्सची सुरुवात 10 रुपयांपासून सुरू होते. सर्वात स्वस्त रिचार्जमध्ये कंपनी 10 रुपयांचा टॉप-अप देते. त्याशिवाय 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1000 रुपयांचाही टॉप-अप प्लॅन मिळतो.

10 रुपये टॉप-अपमध्ये काय मिळेल?

10 रुपयांच्या टॉप-अपमधअये अनलिमिटेड वॅलिडिटीसह 7.47 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. या टॉक-टाइमचा वापर कॉलिंग, डेटा, एसएमएस कोणत्याही गोष्टीसाठी करता येईल. त्याशिवाय इंटरनॅशनल सर्विसचाही वापर करता येईल.

Jio चे सर्व टॉप-अप प्लॅन्स अनलिमिडेट वॅलिडिटीसह येतात. म्हणजे तुमचा टॉक टाइम बॅलेन्स एक्सपायर होत नाही. तुम्ही हे पैसे कितीही दिवस वापरु शकता. कंपनी 20 रुपयांत 14.95 रुपयांचा टॉक टाइम देते. तर सर्वात महागड्या टॉप अपमध्ये 844.46 रुपयांचा टॉक टाइम मिळतो.

हे वाचा - IPL 2022: Jio चा सर्वात स्वस्त Recharge Plan, फ्रीमध्ये पाहता येतील सामने

Jio चा नवा रिचार्ज प्लॅन -

जिओने 259 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. यात डेटा, SMS, अनलिमिडेट कॉल्स मिळतात. हा कंपनीचा एक महिन्याचा वॅलिडिटी असणारा प्लॅन आहे. युजर्सला या प्लॅनमध्ये एक महिन्यासाठी 1.5GB डेली डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. त्याशिवाय युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी Apps चं सब्सक्रिप्शनही मिळतं. कंपनीने IPL चा सीजन पाहता रिचार्ज प्लॅन जारी केले आहेत.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Reliance jio postpaid