मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

World record! जगातील सर्वात fast internet, एका सेकंदात 57 हजार चित्रपट होतील download

World record! जगातील सर्वात fast internet, एका सेकंदात 57 हजार चित्रपट होतील download

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जपानने (Japan) मोठा कारनामा केला असून सर्वच जण हैराण आहेत. जपानने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जपानने (Japan) मोठा कारनामा केला असून सर्वच जण हैराण आहेत. जपानने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जपानने (Japan) मोठा कारनामा केला असून सर्वच जण हैराण आहेत. जपानने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 जुलै: इंटरनेटच्या (Internet) वापराने आपलं आयुष्य अधिक सोयीचं, सोपं, सहज झालं आहे. भारतात एकीकडे 5G चं टेस्टिंग 5G (Internet Testing) सुरू असताना चीन-अमेरिकेत 6G वर टेस्टिंग सुरू आहे. पण या सगळ्यात जपानने (Japan) मोठा कारनामा केला असून सर्वच जण हैराण आहेत. जपानने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नोलॉजीच्या (NIICT) लॅबमध्ये टेस्टिंगदरम्यान इंटरनेट स्पीड 319 टेराबाईट प्रति सेकंद आल्याचं आढळलं आहे. हुशार आणि कुशल इंजिनियर्सनी हा स्पीड मिळवण्यासाठी खास धातूपासून बनवलेल्या अॅप्लिफायर आणि विविध वेवलेंथसाठी 552 चॅनल कॉम्ब लेजरचा वापर केला. एका सेकंदात युजर्स 57 हजार चित्रपट डाउनलोड करू शकतात. इतका स्पीड आहे, की मोठ-मोठ्या फाईल्सही काही सेकंदात डाउनलोड होतील.

(वाचा - तुमचा फोन हॅक झाला आहे? या गोष्टींवरून लगेच लक्षात येईल)

मागील वर्षीही अशाप्रकारचं टेस्टिंग करण्यात आलं होतं. त्यात 178 टेराबाईट प्रति सेकंद स्पीडची नोंद करण्यात आली होती. हे टेस्टिंग जपान आणि ब्रिटेनच्या इंजिनियर्सनी मिळून केलं होतं. यावर्षी टेस्टिंगमध्ये जपानने हा रेकॉर्डही मोडला आहे. जपानच्या लॅबमध्ये इतका स्पीड मिळवण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला गेला.

(वाचा - Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp हॅकची शक्यता)

अमेरिकेतील स्पेस एजेन्सी नासा 440 गीगाबाईट प्रति सेकंद स्पीड इंटरनेटचा वापर करते. तर भारतात अधिकाधिक ब्रॉडबँडचा स्पीड जवळपास 512kbps आहे.

दरम्यान,  देशात 5G वर काम सुरू करण्यात आलं आहे. टेलिकॉम कंपन्या यासाठी ट्रायल करत आहेत. नुकतंच Bharti Airtel ने 5G ट्रायल गुरुग्राममध्ये सुरू केलं आहे. यात डाउनलोड स्पीड 1Gbps पर्यंत आहे. आता Reliance Jio नेही मुंबईत 5G ट्रायल सुरू केलं असल्याची माहिती आहे. 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स (Indigenously Developed Equipment) आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. त्याशिवाय इतर Samsung, Ericson आणि Nokia सोबत चर्चा सुरू आहे, जेणेकरुन दुसऱ्या शहरांतही येणाऱ्या काळात ट्रायल सुरू केलं जाऊ शकेल.

First published:

Tags: High speed internet, Internet