मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp सह इतर डेटा हॅक होण्याची शक्यता

Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp सह इतर डेटा हॅक होण्याची शक्यता

एकदा पेगासस मोबाईल फोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण फोनवर कंट्रोल होतो. फोनचे संपूर्ण डिटेल्स त्याकडे जातात.

एकदा पेगासस मोबाईल फोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण फोनवर कंट्रोल होतो. फोनचे संपूर्ण डिटेल्स त्याकडे जातात.

एकदा पेगासस मोबाईल फोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण फोनवर कंट्रोल होतो. फोनचे संपूर्ण डिटेल्स त्याकडे जातात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 जुलै : पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) पुन्हा एकदा चर्चेत आहे. 2019 रोजी काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर याचा अटॅक झाल्यानंतर भारतात हे नाव ऐकण्यात आलं होतं. या व्हायरस पीडित लोकांना व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेगाससने त्यांच्या फोनवर कब्जा केल्याचं मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. अनेक प्रमुख वेबसाईट्सवरुन मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 40 हून अधिक पत्रकार, कार्यकर्ते आणि इतर प्रमुख लोक सामिल होते, ज्यांच्यावर या व्हायरसद्वारे नजर ठेवली जात होती. काय आहे Pegasus Spyware, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कशी होते याची एन्ट्री?

पेगासस व्हायरस एका इज्रायली कंपनी एनएसओने (NSO) विकसित केला आहे. पेगासस स्पायवेअरबाबत पहिली माहिती 2016 मध्ये मिळाली होती. हा स्पायवेअर लोकांच्या फोनमध्ये नजर ठेवत होता. पेगासस स्पायवेअर आपल्या टार्गेट फोनवर एक एक्सप्लॉयट लिंक पाठवतो. जर टार्गेट केलेल्या व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केलं, तर ज्या मालवेअर किंवा कोडद्वारे नजर ठेवली जाते, तो फोनमध्ये इन्स्टॉल होतो. अनेकदा त्या लिंकवर क्लिक करण्याचीही गरज भासत नाही. एकदा पेगासस मोबाईल फोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण फोनवर कंट्रोल होतो. फोनचे संपूर्ण डिटेल्स त्याकडे जातात.

तुमचा फोन हॅक झाला आहे? या गोष्टींवरून लगेच लक्षात येईल

सप्टेंबर 2018 मध्ये टोरंटो सिटीजन लॅबने या स्पायवेअरबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. पेगासस स्पायवेअर इतका धोकादायक आहे, की युजर्सच्या परवानगीशिवायच तो फोनमध्ये इन्स्टॉल होतो आणि फोनचा कंट्रोल मिळवतो. सिटीजन लॅबने त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात जवळपास 45 देशांमध्ये हा स्पायवेअर अ‍ॅक्टिव्ह होता.

फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर, फोनवर या व्हायरसचा कब्जा होतो. पेगासस प्रायव्हेट डेटा, पासवर्ड कॉन्टॅक्ट लिस्ट, कॅलेंडर इव्हेंट, टेक्स्ट मेसेज, लाईव्ह व्हॉईस कॉलवर कब्जा करतो. कॅमेरा, मायक्रोफोनही युजरच्या मर्जीशिवायच ऑन होतो. स्पायवेअर फोनमध्ये सोडणारा व्यक्ती हे सर्व ऐकू शकतो. पेगासस इन्स्टॉल झाल्यानंतर पासवर्ड प्रोटेक्टेड राहत नाही. त्यामुळे कोणत्याही व्हायरस, स्पायवेअरपासून वाचण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

First published:

Tags: Hacking, Spyware, Tech news, Whatsapp