Home /News /technology /

तुमचा फोन हॅक झाला आहे? या गोष्टींवरून लगेच लक्षात येईल

तुमचा फोन हॅक झाला आहे? या गोष्टींवरून लगेच लक्षात येईल

स्मार्टफोन (Smartphone) ही आता आपली दैनंदिन गरज झाली आहे. आपण अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून राहू लागलो आहोत; मात्र स्मार्टफोन योग्य प्रकारे वापरला नाही, तर आपली प्रायव्हसी (Privacy) धोक्यात येऊ शकते.

मुंबई, 20 जुलै : स्मार्टफोन (Smartphone) ही आता आपली दैनंदिन गरज झाली आहे. आपण अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून राहू लागलो आहोत; मात्र स्मार्टफोन योग्य प्रकारे वापरला नाही, तर आपली प्रायव्हसी (Privacy) धोक्यात येऊ शकते. कारण फोन हॅक झाला, तर आपण काय करतो, कुठे जातो, कोणाशी बोलतो आदींची हेरगिरी होण्याचा धोका नाकारता येत नाही. सध्या स्मार्टफोन हॅकिंगच्या (Hacking) अनेक घटना आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. अशा स्थितीत आपला स्मार्टफोन हॅक झालेला नाही ना असा प्रश्न मनात नकळत निर्माण होतो. अनेकदा आपला स्मार्टफोन हॅक झाल्याचं आपल्या वेळेवर लक्षात आलं नाही तर नुकसान होऊ शकतं. या सर्व पार्श्वभूमीवर, आपला स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, हॅकिंग टाळण्यासाठी काय करायचं या विषयी अधिक माहिती देणाऱ्या काही टिप्स आम्ही सांगणार आहोत. पिगॅससच्या (Pegasus) माध्यमातून अनेक जणांची हेरगिरी केली जात आहे. ही हेरगिरी केवळ मोठ्या व्यक्तींची किंवा सेलिब्रिटींची होते, असं आपल्याला वाटतं. परंतु प्रत्यक्षात तसं नाही. मालवेअर (Malware) किंवा सॉफ्टवेअरच्या (Software) मदतीनं सर्वसामान्य लोकांचे फोन हॅक केले जाऊ शकतात. असं कृत्य करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु, फायनान्शिअल फ्रॉड (Financial Fraud) हा त्यामागचा प्रमुख हेतू असतो, असं अनेक वृत्तांवरून दिसतं. हॅकिंग टाळण्यासाठी, तसंच तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे समजून घेण्यासाठी काही निकष आहेत. ते नीट लक्षात घेतले पाहिजेत. - कोणतंही अॅप अधिकृत अॅप स्टोअरमधूनच (Play Store, Apple App Store) डाउनलोड करावं. - अनोळखी लिंकवरून किंवा वेबसाइटवरून कोणतंही अॅप (App) इन्स्टॉल करू नये. - सार्वजनिक वायफाय वापरू नये. - फोन सुरक्षित राहावा यासाठी दर्जेदार अँटी-व्हायरसचा वापर करावा. तुमचा फोन पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बॅटरी वापरत असेल तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी बॅटरी खराब झाली असेल म्हणूनच ती लवकर संपत असेल असं नाही. अनेकदा मालवेअर बॅकग्राउंडला सुरू असतात. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. त्यातच तुमच्या फोनचा परफॉर्मन्स अचानक कमी होतो, फोन वारंवार रिस्टार्ट होऊ लागतो. ही सर्व लक्षणं स्मार्टफोन हॅक झाल्याची असून, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हॅक झालेला मोबाइल/डिव्हाइस मॅलिशियस सर्व्हरशी (म्हणजे वाईट हेतूने चालवल्या जाणाऱ्या सर्व्हरशी) अनेकदा संपर्क साधतो. हा सर्व्हर अतिरिक्त मालवेअर डाउनलोड करुन स्वतःला अपडेट करत असतो. त्याशिवाय फोनवरील कॉन्टॅक्ट्स, छायाचित्रं आणि दुसऱ्या युजरचा डेटा सर्व्हरला पाठवत असतो. यामुळे डेटाचा वापर अधिक प्रमाणात वाढतो. हेदेखील फोन हॅक झाल्याचं लक्षण म्हणता येईल. तुमच्या फोनमध्ये तुम्ही इन्स्टॉल न केलेली अॅप्स दिसत असतील, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त एखादं अॅप सुरू असताना मध्येच ते काही वेळासाठी थांबते. तसंच अनेकदा फोनमध्ये पॉप-अॅडदेखील दिसू लागतात. अशा गोष्टी दिसून येत असतील तर वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे. हे सर्व प्रकार तुमच्या फोनमध्ये दिसत असल्यास फोन फॅक्टरी रिसेट (Factory Reset) करावा. त्याचबरोबर तातडीने आपले ई-मेल पासवर्ड, बॅंकिंग पासवर्ड, अन्य अकाउंट्सचे पासवर्ड बदलावेत. डेटा बॅकअप घ्यावा.
First published:

Tags: Hacking, Smartphone

पुढील बातम्या