नवी दिल्ली, 31 मार्च : लोकप्रिय सोशल मीडीया असणाऱ्या ट्विटरचे (Twitter) सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी (jack Dorsy) यांनी 15 वर्षांपूर्वी केलेलं एक ट्वीट (Tweet) नुकतंच तब्बल 18 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. या ट्विटला इतकी प्रचंड किंमत मिळण्याचं कारण तरी काय आहे? ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांचं पहिलं ट्विट (First Tweet) आहे. तसंच यामध्ये ट्विटरचं स्पेलिंग (Spelling) आजच्यासारखं Twitter असं नाही, तर ते twttr असं आहे. असं चुकीचं स्पेलिंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीनं चुकीचं का लिहिलं असा प्रश्न पडला असेल, तर याचं उत्तर असं आहे की, त्या वेळी डोमेन नेमचा फायदा घेण्यासाठी अशाच प्रकारे इंग्रजी भाषेतील स्वर (i आणि e) काढून टाकून स्पेलिंग लिहिण्याची पद्धत होती. नंतर ट्विटर त्याच्या अधिकृत स्पेलिंगप्रमाणेच रूढ झालं. जॅक डोर्सी यांनी हे पहिलं ट्विट 6 मार्च 2006 रोजी केलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये हे ट्विट ‘व्हॅल्युएबल्स’ (Valuables) नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिलावासाठी (Auction) आलं. हा एक एनएफटी (Non-Fungible Token) प्लॅटफॉर्म आहे. हे एका प्रकारचं डिजिटल प्रमाणपत्र (Digital Certificate) आहे. याचा वापर अमूल्य डिजिटल वस्तूंसाठी केला जातो. त्याद्वारे त्या वस्तूंचं वेगळेपण आणि किंमत सिद्ध होते. डिजिटल बाजारपेठेतच याची खरेदी विक्री होऊ शकते. ऑनलाइन गेमिंगचे (Gaming) शौकीन असणाऱ्या लोकांसाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाचा ठरतो. यावर एखाद्यानं खेळण्यासाठी व्हर्च्युअल स्पेस खरेदी केली तर तिथं खेळण्यासाठी दुसऱ्या लोकांना या मालकाला पैसे द्यावे लागतात.
(वाचा - बायको, नवरा किंवा मित्र, कुणीही असो; आता वापरता येणार नाही एकच Netflix पासवर्ड )
just setting up my twttr
— jack (@jack) March 21, 2006
(वाचा - Video: उन्हाळ्याच्या दिवसात वापरा AC Helmet, बायकर्ससाठी खास गॅजेट, किंमतही कमी )
अशा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 22 मार्च रोजी जॅक डोर्सी याचं हे पहिलं ट्विट लिलावासाठी आलं. काही मिनिटांतच याच्यावर धडाधड बोली लागू लागल्या. काही वेळातच लाखांवरून याची बोली कोटींमध्ये गेली. अखेर ब्रिज ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीना एस्तावी यांनी सुमारे 18 कोटी रुपयांना हे ट्विट विकत घेतलं. त्यांना 15 वर्ष जुन्या अशा ट्विटची मालकी मिळाली असून, त्याबरोबर एक डिजिटल प्रमाणपत्र आणि क्रिप्टोग्राफी मिळाणार असून, त्याद्वारे या ट्विटचा मेटाडाटा काय आहे, याची माहिती असेल. जॅक डोर्सी यांनी या लिलावातून मिळालेली रक्कम आफ्रिकेतील (Africa) कोरोना लसीकरणासाठी दान करण्याची घोषणा केली आहे. आफ्रिकेत अधिक घातक नवीन कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे.