मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Amazing! आता फोन चेक करणार तुमचं बॉडी टेंपरेचर, काय आहे या नव्या मोबाइलची किंमत?

Amazing! आता फोन चेक करणार तुमचं बॉडी टेंपरेचर, काय आहे या नव्या मोबाइलची किंमत?

पाहताना हा एखाद्या फीचर फोनप्रमाणे वाटतो, पण या फोनची खास बाब म्हणजे, यात इन-बिल्ट टेंपरेचर सेंसर देण्यात आला आहे. या फोनद्वारे युजरचं टेंपरेचर तपासता येऊ शकतं. अशा फीरचसह येणारा हा भारतातील पहिला मोबाईल फोन ठरला आहे.

नवी दिल्ली, 12 मे: कोरोना काळात स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने खास मोबाईल फोन it2192T Thermo Edition लाँच केला आहे. पाहताना हा एखाद्या फीचर फोनप्रमाणे वाटतो, पण या फोनची खास बाब म्हणजे, यात इन-बिल्ट टेंपरेचर सेंसर देण्यात आला आहे. या फोनद्वारे युजरचं टेंपरेचर तपासता येऊ शकतं. अशा फीरचसह येणारा हा भारतातील पहिला मोबाईल फोन ठरला आहे. या फोनची किंमत 1049 रुपये आहे.

itel च्या या फोनला 4.5cm डिस्प्ले देण्यात आला आहे. हा की-पॅड असणारा फोन आहे. या फोनमध्ये टेक्स्ट टू स्पीच फीचर देण्यात आलं आहे, याच्या मदतीने बोलूनच टाईप करण्याची सुविधा आहे. हा फोन इंग्रजी, हिंदी, पंजाबी, बंगाली, तेलुगू, कन्नड आणि गुजराती या 8 भारतीय भाषांना सपोर्ट करतो.

फोटोसाठी फोनमध्ये रियर कॅमेराही देण्यात आला आहे. itel च्या या नव्या it2192T Termo Edition मध्ये 1000mAh बॅटरी आहे, जी सिंगल चार्जमध्ये चार दिवसांपर्यंतचा बॅकअप देते. त्याशिवाय वायरलेस FM रेकॉर्डिंग, टच म्यूट, ऑटो कॉल रेकॉर्डर, LED टॉर्च आणि प्री-लोडेड गेमसारखे फीचर्स आहेत.

it2192T Termo Edition मध्ये इन-बिल्ट टेंपरेचर सेंसर आहे, ज्याच्या मदतीने शरीराचं तापमान तपासलं जाऊ शकतं. थर्मो सेंसर, कॅमेऱ्याच्या बाजूला प्लेस करण्यात आला आहे.

(वाचा - ऑक्सिजन, हार्ट रेट, झोप आणि ताण, सगळ्यावर लक्ष ठेवणार एक Smart Watch)

कसं चेक करता येईल टेंपरेचर -

या फीचरचा वापर करण्यासाठी युजरला फोनच्या थर्मो बटणवर काही वेळ प्रेस करुन ठेवावं लागेल. तसंच सेंसरवर हात किंवा एखादं बोट ठेवावं लागेल, त्यानंतर फोन शरीराच्या तापमानाची माहिती देईल. बॉडी टेंपरेचर सेल्सियस आणि फॉरेन हाइटमध्ये मापलं जाईल. टेंपरेचर मॉनिटरिंगशिवाय itel it2192T फोनद्वारे कॉलिंग आणि मेसेजेसही केले जाऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Tech news