जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ऑक्सिजन, हार्ट रेट, झोप आणि ताण, सगळ्यावर लक्ष ठेवणार एक Smart Watch

ऑक्सिजन, हार्ट रेट, झोप आणि ताण, सगळ्यावर लक्ष ठेवणार एक Smart Watch

ऑक्सिजन, हार्ट रेट, झोप आणि ताण, सगळ्यावर लक्ष ठेवणार एक Smart Watch

कोरोना महामारीमुळे (Corona Virus) आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं झालं आहे. तसंच, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या निदर्शकांची, लक्षणांची तपासणीही वेळोवेळी करणं गरजेचं ठरत आहे. यासाठी स्मार्ट वॉच (Smart Watch) महत्त्वाचं ठरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 12 मे : कोरोना महामारीमुळे (Corona Virus) आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं झालं आहे. तसंचआपल्या शरीराच्या महत्त्वाच्या निदर्शकांचीलक्षणांची तपासणीही वेळोवेळी करणं गरजेचं ठरत आहे.  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रक्तातल्या  ऑक्सिजनची पातळी घटण्याची समस्या अनेक रुग्णांमध्ये आढळून येत आहे.  त्यामुळे  SpO2  अर्थात रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी वेळोवेळी तपासणं गरजेचं  झालं आहे. खासकरून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी ते आवश्यक आहे.  तसंच मधुमेह (Diabetes)  किंवा अन्य सहव्याधी (Co-Morbidities)  असलेल्या  रुग्णांसाठीही ही तपासणी महत्त्वाची ठरते. ही पातळी मोजण्यासाठी  पल्स ऑक्सिमीटरचा (Pulse Oximeter)  वापर केला जातो. पल्स ऑक्सिमीटरच्या  मागणीत अचानक मोठी वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी किंवा अनेक ऑनलाइन शॉपिंग  पोर्टल्सवर ऑक्सिमीटर आउट ऑफ स्टॉक झाले आहेत. दरम्यान,आता काही  स्मार्टवॉचमध्येही (Smartwatch)  रक्तातल्या ऑक्सिजनच्या पातळीसह हृदयाचे  ठोकेही मोजता येतात. तसंच झोपेबद्दलची निरीक्षणंही नोंदवता येतात. अशाकाही स्मार्टवॉचेसची माहिती इथे देत आहोत. Oppo Band Style ओप्पोचा  हा फिटनेस बँड दिसायला खूप स्टायलिश आहे. हा फिटनेस बँड (Fitness Band)  रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजतो त्यावर लक्ष ठेवतो. हार्ट रेट अर्थात  हृदयाचे ठोकेही याद्वारे मोजता येतात. त्यासोबत  12  वर्कआउट मोड्स आणि  40हून  अधिक वॉच फेस यात आहेत. या फिटनेस बँडची किंमत  2399  रुपये आहे. OnePlus Band वनप्लसच्या  फिटनेस बँडमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी खास  सेन्सर समाविष्ट करण्यात आला आहे. हार्ट रेटही याद्वारे ट्रॅक करता येतो  आणि  13  एक्सरसाइज मोडही त्यात आहेत. या फिटनेस बँडला  IP68  रेटिंग आहे. याचाअर्थ असा की हा बँड वॉटर रेझिस्टंट आणि डस्ट रेझिस्टंट आहे. हा बँड केवळ  अँड्रॉइड यंत्रणेलाच सपोर्ट करतो. या बँडची किंमत  2499  रुपये आहे. Honor Watch ES ऑनरच्या  ES  वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटर फीचर आहे. हे स्मार्टवॉच हार्ट रेट आणि  स्ट्रेस यांवरही लक्ष ठेवतं.  95  वर्कआउट मोड्स या वॉचमध्ये असून पर्सनलाइज  वॉच फेस असं फीचरही यात देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचला  1.64  इंची  AMOLED  टच डिस्प्ले देण्यात आला आहे. फुल चार्ज झाल्यानंतर हे स्मार्टवॉच  10  दिवसांचा बॅटरी बॅकअप देतं. या स्मार्टवॉचची किंमत  4999  रुपये आहे. Amazfit Bip U Pro अमेझफिटच्या  Bip U Pro  या स्मार्टवॉचचं सर्वांत स्पेशल फीचर आहे ते SpO2म्हणजे ब्लड  ऑक्सिजन मॉनिटरिंग. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून ब्लड ऑक्सिजन लेव्हल  सातत्याने ट्रॅक करता येते. यात  1.43  इंची  IPS LCD  डिस्प्ले असून यात  60  हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. या स्मार्ट वॉचच्या माध्यमातून  ब्लड ऑक्सिजन व्यतिरिक्त स्लीप (झोप) हार्टरेट आणि स्ट्रेस यांनाही ट्रॅक  करता येतं. या स्मार्टवॉचची किंमत  4999  रुपये आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात