जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचा Smartphone स्लो झालाय? WhatsApp च्या या दोन ट्रिक फॉलो कराच

तुमचा Smartphone स्लो झालाय? WhatsApp च्या या दोन ट्रिक फॉलो कराच

काही लोक मोठ्या व्यक्ती किंवा इतर लोकांचा प्रोफाईल फोटो लावून फेक अकाउंट तयार करतात. फॉलोवर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य करणं हा त्यामागचा उद्देश, हेतू असू शकतो.

काही लोक मोठ्या व्यक्ती किंवा इतर लोकांचा प्रोफाईल फोटो लावून फेक अकाउंट तयार करतात. फॉलोवर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य करणं हा त्यामागचा उद्देश, हेतू असू शकतो.

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सर्वच जण करत असल्याने फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट अशा अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जातात. त्यामुळे मोबाईलमध्ये उगाचच डेटा भरतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जुलै: देशात काही लोकसंख्या वगळता अनेकांकडे स्मार्टफोन (Smartphone) आहेत. लॉकडाउन काळात तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशात स्मार्टफोन हँग झाला, स्लो झाल्याच्या समस्या आल्यास ही बाब त्रासदायक ठरते. परंतु एका ट्रिकद्वारे फोन हँग न होता, फास्ट काम करू शकेल. ही ट्रिक व्हॉट्सअ‍ॅप क्लिन करण्याची आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सर्वच जण करत असल्याने फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट अशा अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जातात. त्यामुळे मोबाईलमध्ये उगाचच डेटा भरतो. WhatsApp वर अनेकांचे अनेक ग्रुप्स असतात. अशात युजर्स ऑटो डाउनलोड ऑफ करत नाही, त्यामुळे फोनमध्ये आलेले फोटो, व्हिडीओ आपोआप सेव्ह होतात. यामुळेच फोनमध्ये मीडिया स्टोरेज भरतो. परंतु एका ट्रिकद्वारे अशाप्रकारे स्लो झालेल्या फोनचा स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते. चीनमधून भारतात होत होता Online Fraud, सायबर क्राईमचा प्रकार पाहून पोलिसही हैराण - सर्वात आधी WhatsApp Account सेटिंग्समध्ये स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा. - इथे मीडिया ऑटो डाउनलोडचा ऑप्शन असतो. - यात तीन पर्याय दिसतील, ते तुमच्या हिशोबाने निवडता येतील. Online Classमध्ये कपलचं सेक्स; कॅमेरा सुरू राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि…. - जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल, तर इथे आलेला डेटा ऑटो डाउनलोड होतो. तो तुम्ही टाईम-टू-टाईम क्लिन करू शकता. - यासाठी WhatsApp Account सेटिंग्स स्टोरेज आणि डेटामध्ये Manage Data चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन डेटा क्लिक करू शकता. Instagram वर फोटो एडिट करणं पडेल महागात; नव्या कायद्यात जेलसह दंडाचीही तरतूद या सेटिंग्समुळे तुम्हाला पाठवण्यात आलेले फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आपोआप डाउनलोड होणार नाहीत. त्यामुळे गॅलरी भरणार नाही. त्यासोबतच स्मार्टफोनचा स्पीडही वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात