मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता Paytm द्वारे काढता येणार Railway Ticket, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

आता Paytm द्वारे काढता येणार Railway Ticket, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

आता रेल्वे प्रवासी जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मंथमी स्मार्ट पास डिजीटल ट्रान्झेक्शनद्वारे रिचार्ज करू शकतील. रेल्वे स्टेशनवर लावलेल्या ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनमध्ये (ATVM) Paytm QR Code स्कॅन करुन तिकीट बुक करता येऊ शकेल

नवी दिल्ली, 22 मार्च : Paytm App द्वारे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जनरल तसंच प्लॅटफॉर्म तिकीटही बुक करू शकता. यासाठी कंपनीने भारतीय रेल्वे तिकीट प्रोव्हाइडर IRCTC सह भागीदारी केली आहे. देशभरातील रेल्वे स्टेशनवर लावलेल्या ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनमध्ये (ATVM) Paytm QR Code स्कॅन करुन तिकीट बुक करता येऊ शकेल. भारतीय रेल्वे आणि पेटीएमची ही भागीदारी भारत सरकारच्या डिजीटल इंडिया मिशनला (Digital India Mission) प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे.

आयआरसीटीसी (IRCTC) आणि पेटीएममध्ये (Paytm) डिजीटल तिकीट सर्विससाठी भागीदारी झाली आहे. आता रेल्वे प्रवासी जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मंथमी स्मार्ट पास डिजीटल ट्रान्झेक्शनद्वारे रिचार्ज करू शकतील.

रेल्वे प्रवासी आता विना कॅश पहिल्यांदाच स्टेशनवर फिजिकल तिकीट घेऊ शकतील. Automatic Ticket Vending Machine (ATVM) द्वारे तिकीट बुक करताना डिजीटल पेमेंट UPI चा पर्यायही मिळेल. IRCTC ने ही सर्विस देशभरातील अशा रेल्वे स्टेशनसाठी रोल आउट केली आहे, जिथे तिकीट वेंडिंग मशीन उपलब्ध आहे.

हे वाचा - Chromeयुजर्ससाठी सरकारकडून हाय रिस्क अलर्ट,वापरत असाल तर लगेच करा महत्त्वाचं काम

Paytm वरुन प्रवासी तिकीट बुक करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट, सीजनल तिकीटही रिन्यू करता येईल. युजरला तिकीट बुक करण्यासाठी UPI शिवाय Paytm Wallet, Paytm Postpaid, Net Banking, Credit आणि Debit Card चे पर्याय मिळतील. यापैकी कोणताही डिजीटल पेमेंट पर्याय निवडता येतो.

भारतीय रेल्वेच्या ऑटोमॅटिक तिकीट वेंडिग मशीनसाठी पेटीएम क्यूआर (Paytm QR) पर्याय आणत आहोत. जेणेकरुन प्रवाशांना पूर्णपणे कॅशलेस प्रवास करता येईल, असं पेटीएम प्रवक्त्यांनी सांगितलं.

हे वाचा - या 4 स्टेप्सने वेरिफाय करा Aadhaar Card, ऑनलाइन फ्रॉडपासून होईल बचाव

कसं करता येईल ATVM ट्रान्झेक्शन -

जवळच्या रेल्वे स्टेशनवर Automatic Ticket Vending Machine (ATVM) मशीनवर पेटीएम (Paytm) पर्याय निवडा. त्यानंतर स्मार्टफोनवरुन QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर ATVM ने तिकीट किंवा स्मार्टकार्ड रिचार्ज होईल. स्मार्टकार्ड रिचार्ज करण्यासाठी स्मार्टकार्ड नंबर टाकावा लागेल.

First published:
top videos

    Tags: IRCTC, Paytm, Paytm Money, Tech news