Home /News /technology /

iQOO 3 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच; 'ही' आहे किंमत...नव्या ब्रॅंडचा नवा दम

iQOO 3 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच; 'ही' आहे किंमत...नव्या ब्रॅंडचा नवा दम

iQOO 3 फोन भारतात लॉंच झाला आहे. Vivo च्या सबब्रॅंडचा पहिला फोन बाजारात आला आहे.

    मुंबई, 25 फेब्रुवारी :  iQOO 3 स्मार्टफोन भारतात लॉंच होता आहे. चिनी कंपनीनं iQOO हा नव्या ब्रँडचा फोन आणला आहे. नव्या दमासह नवी फिचर असलेला फोन भारतात लॉंच करण्यात आलाय. Vivo ब्रॉंडला भारतात ग्राहकांनी पसंती दिली. त्यामुळे आता या नव्या ब्रॅंडला पसंती मिळणार यात शंकाचं नाही. भारतातला हा दुसरा 5G फोन असणार आहे. Realme नं याआधी पहिला 5G फोन लॉंच केला आता त्या पाठोपाठ Vivo नं आपल्या सबब्रॅंडलाच नव्या ओळखीसह बाजारात आणल आहे. अप्पो आणि विओ हे सुरूवातीपासूनचं बाजारपेठांमध्ये एकमेकांचे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे अप्पो पाठोपाठ आता विवो ही या 5G च्या स्पर्धेत उतरल आहे. नव्या iQOO 3 मध्ये रिअर कॅमेरासह विविध वैशिष्टये देण्यात आलीय. 6.44″ Super AMOLED Display असणार आहे. यामध्ये 12GB रॅम देण्यात आल आहे. तर फोन मेमरी 256GB आहे. विशेष म्हणजे यामध्ये 48MP Quad Camera असून 16MP चा फ्रंट देण्यात आलं आहे. वाचा - Realme चा 5G फोन भारतात लाँच; पहिल्यांदाच वाढली एवढी किंमत ग्राहकांसाठी एक दु;खाची बातमी आहे. ती म्हणजे हा फोनमध्ये जरी 5G हे नवं फिचर असलं तरी देखिल ते ग्राहकांना लगेच वापरात आणता येणार नाही आहे. ते 5G वापरासाठी वापरकर्त्यांना वाट पाहावी लागणार आहे. iQOO 3 बॅंडचा 5G वाला फोन 45 हजारांपर्यंत उपलब्ध होणार आहे. Realme नं आणलेल्या नव्या फोनच्या तुलनेत हा फोन अधिक स्वस्त आहे. त्यामुळे आता ग्राहक कोणाला अधिक पसंती देतात हे पाहावं लागेल. ------------------------------- अन्य बातम्या 'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याचीही माहिती देणार मोदींनी 24 तासात बदललं ट्रम्प यांचं मन! पाक, काश्मीर आणि CAA वर काय म्हणाले?
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Oppo, Phone, Vivo

    पुढील बातम्या