Home /News /technology /

Realme चा 5G फोन भारतात लाँच; पहिल्यांदाच वाढली एवढी किंमत

Realme चा 5G फोन भारतात लाँच; पहिल्यांदाच वाढली एवढी किंमत

Realme कंपनीनं 5G चा पहिला फोन भारतीयांसाठी आणला आहे. Realme कंपनीचा आतापर्यंतचा हा सर्वात महागडा फोन असणार आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी :  Realme कंपनीनं भारतात आणखी एक नवा प्रयोग केला आहे. 5G चा पहिला फोन Realme कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लॉंन्च केलाय. चीन बनावटीचा Realme X50 Pro 5G  भारतात लॉन्च झाला. अनेक नवे फिचर आहेत. या स्मार्टफोनचा RAM 12 GB असून इंटरनल मेमरी 256 GB आहे. या स्मार्टफोनमध्ये  Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आलाय. त्यासोबतचं Dual Mode 5G सपोर्ट देखिल या फोनमध्ये देण्यात आलाय. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. भारतात हा फोन 49 हजारांपर्यंत मिळणार आहे. आता पर्यंतच्या Realme कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असणार आहे. या फोनमध्ये 6 कॅमेर असून यात 64 मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देखिल असणार आहे. सेल्फी कॅमेरा हा 32 मेगापिक्सलचा आहे. फोनच्या टीझरवरून यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. रियलमी एक्स२ प्रो मध्ये २०एक्स हायब्रिड झूम फीचर दिलं गेलंय.Realme कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी हा नवा महागडा फोन बाजारात आणलाय. यामध्ये झूम, टच टू फोकस, ऑटो फ्लॅश यासह अनेक वैशिष्ट यात आहेत.  स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आलाय.64W सुपर डार्ट फास्ट चार्जिंग या फोनमध्ये करता येणार आहे. रस्ट रेड  आणि मॉस ग्रीन हे कलर या फोनमध्ये ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत. याआधी हा फोन बार्सिलोनामध्येलाँच करण्यात येणार होता. परंतु, करोना व्हायरसच्या भीतीने  त्याचं लॉन्चिंग पुढे ठकलण्यात आलं. चिनमध्ये कोरोना वायरसनं थैमान घातलंय. त्याचा परिणाम भारत -चीन व्यापारावर देखिल होताना पाहायला मिळतोय. मात्र कोरोना वायरसच्या दुखण्याला मागे टाकत Realme कंपनाचा हा नवा फोन भारतात लॉन्च झालाय. Realme चा हा फोन 5G स्मारफोन असला तरी ही 5G कनेक्टिविटी भारतात सुरू होण्यासाठी वापरकर्तांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र हा फोन भारतात येण्याआधीच ग्राहकांनी त्याची बुकींग सुरू केलीय. त्यामुळे आता Realme चा हा 5G प्रयोग टक्कर देणार ठरणार आहे. ------------------ अन्य बातम्या धक्कादायक! तुमच्या WhatsApp ग्रुपची लिंक गुगलवर, कोणीही होऊ शकतं ADD? Jio, Airtel, Vodafone-Idea : कंपन्याकडून 547 GB पर्यंत डेटाची ऑफर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Mobile, Realme x50 pro

    पुढील बातम्या