नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवस भारत दौऱ्यावर आले होते. दौरा संपल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या सविस्तर चर्चेबद्दल माहिती दिली. यामध्ये दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरही ट्रम्प बोलले. ते म्हणाले की, मोदींसोबत धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा केली. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य हवं असल्याचंही मोदींनी सांगितलं. मोदी त्यावर खूप काम करत आहेत. दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावरही ट्रम्प यांनी वक्तव्य केलं. काही हल्ल्यांबाबत मी ऐकलं पण त्यावर कोणती चर्चा झाली नाही. मोदींशी सीएए वर चर्चा झाली. सीएए हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सीएए विरोधात आंदोलनावेळी हिंसाचार झाला. यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली. ते म्हणाले की, काश्मीर प्रकरणात दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यात मला आनंद होईल. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान यांच्याशी माझी चांगली मैत्री आहे असंही ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान ट्रम्प काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीवरून युटर्नही घेतला. ते म्हणाले की, मी मध्यस्थीबाबत बोललो नव्हतो. काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील मोठा प्रश्न आहे. दोन्ही देश यावर काम करत आहेत. बऱ्याच काळापासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
US President Donald Trump: I didn't say anything about that (being mediator). Kashmir obviously is a big problem between India and Pakistan, they are going to work out their problem. They have been doing it for a long time. pic.twitter.com/QOZ2MD3TZL
— ANI (@ANI) February 25, 2020
इस्लामिक दहशतवादाला रोखण्यासाठी आम्ही काम करत आहे. बगदादीला आम्ही ठार केलं. इराण आणि सिरियाने मिळून आयएसआयएस वर कारवाई करायला हवी असंही ट्रम्प म्हणाले. तालिबान आणि अमेरिका यांच्यातील शांतता करारावर ट्रम्प म्हणाले की, मी मोदींसोबत यावरसुद्धा चर्चा केली. भारताला सुद्धा हा करार व्हावा असं वाटतं. जवळपास हे नक्की आहे त्यामुळे सर्वजण आनंदी आहेत.
US Pres on being asked about terrorism emanating from Pak: We talked a lot about it today. I said I will do whatever I can do to help as my relationship with both gentlemen (PM Modi&Pak PM) is so good...Anything I can do to mediate/help, I'd do. They (Pak) are working on Kashmir pic.twitter.com/RtCkbeuAqZ
— ANI (@ANI) February 25, 2020
भारत दौरा खूप चांगला झाला असं ट्रम्प म्हणाले. भारतासोबत 3 अब्ज डॉलर्सचा करार झाला. पंतप्रधान मोदींशी चांगली मैत्री आहे. दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करायचे आहेत आणि भारत एक चांगली बाजारपेठ असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. वाचा : जगाला धडकी भरविणारी ही हेलिकॉप्टर्स भारत घेणार, 21 हजार कोटींचा करार लोकशाहीवर विश्वास ठेवणं ही गौरवाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदींसोबत सकारातम्क चर्चा झाली असंही ट्रम्प यांनी सांगितलं. भारताचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की, भारत याआधी जितका मला आवडत होता त्यापेक्षा जास्त आता आवडत आहे. इवांका ट्रम्पची ‘सुरुही शेरवानी’, मराठमोळ्या डिझायनरने दिला भारतीय टच