मुंबई, 21 फेब्रुवारी : 'Xiaomi'चा स्मार्ट टूथब्रश भारतात लाँच, कितीवेळ दात घासले याची माहितीही देणार'Mi Electric Toothbrush T300' असं या टूथब्रशचं नाव आहे. एका मिनिटात हा टूथब्रश 31 हजार वेळा व्हायब्रेट होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटार लावण्यात आली असून हा टूथब्रश वॉटरप्रूफ आहे.
इलेक्ट्रिक टूथब्रशसाठी असलेल्या बॅटरीचा बॅकअप 25 दिवसांपर्यंत असल्याची माहिती शाओमीने दिली आहे. याला चार्जिंगसाठी सी यूएसबी पोर्ट आहे. ड्युअर प्रो ब्रश मोडही देण्यात आला असून EquiClean अॅटो टायमरही देण्यात आला आहे. तसेच या ब्रशचा वापर करताना आवाजही कमी होतो. रेग्युलर जो ब्रश आपण वापरतो त्याच्या तुलनेत अधिक स्वच्छता इलेक्ट्रिक ब्रशने होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेल्या टूथब्रशची किंमत 1599 रुपये इतकी आहे. पण सध्या याची विक्री 1299 रुपयांत केली जात आहे. सुरुवातीला कंपनी फक्त 1 हजार ब्रश विकणार आहे. हा ब्रश शाओमीच्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे. 10 मार्चपासून याची विक्री सुरू होईल. जागतिक बाजारपेठेत या ब्रशची किंमत 2300 रुपये आहे.
वाचा : WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय? वापरा या टिप्स
इलेक्ट्रिक टूथब्रशसोबत कंपनीने मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटर, अॅन्टो कोरोशन, मेटल फ्री ब्रश हेड दिलं आहे. युजर्सना मोबाइल अॅपच्या सहाय्याने ब्रश टाइम, ब्रश स्ट्रेन्थ सेट करता येते. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. तुम्ही किती ब्रश केले याचा दररोजचा, साप्ताहिक आणि मासिक रिपोर्टसुद्धा मिळतो.
वाचा : सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.