नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : अनेकदा आपण Old is Gold असं म्हणतो. याच अर्थाचा एक प्रकार समोर आला आहे. Apple च्या सर्वात पहिल्या ओरिजिनल कंप्यूटरचा Apple-1 चा आज अमेरिकेत लिलाव झाला. लिलावातील Apple-1 ची किंमत ऐकून सर्वच जण थक्क झाले आहेत. Apple चा सर्वात पहिला कंप्यूटर Apple-1 तब्बल 4 लाख डॉलरमध्ये खरेदी करण्यात आला आहे. भारतीय रुपयानुसार याची किंमत 2 कोटी 97 लाख 02 हजार 220 रुपये इतकी आहे. या कंप्यूटरची खास बाब म्हणजे हा कंप्यूटर को-फाउंडर स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांनी आणि स्टीव्ह वॉजनिएक (Steve Wozniak) यांनी आपल्या हातांनी बनवला होता.
हा कंप्यूटर Chaffey College Apple-1 कंप्यूटर नावाने ओळखला जात होता. या कंप्यूटरचे खरे मालक Chaffey College चे प्रोफेसर होते. त्यांनी 1997 मध्ये Apple-II कंप्यूटर खरेदी करण्यासाठी Apple-1 आपल्या एका विद्यार्थ्याला विक्री केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे आता इतक्या मोठ्या किंमतीत विक्री झालेल्या हा कंप्यूटर त्यावेळी विद्यार्थ्याने 650 डॉलर देऊन प्रोफेसरकडून घेतला होता.
वर्किंग कंडिशनमध्ये आहे Apple चा पहिला Apple-1 कंप्यूटर -
Apple-1 सध्या जगभरात असलेल्या 60 यूनिट्सपैकी एक आहे. हा अशा 20 Apple-1 कंप्यूटरमध्ये सामिल आहे, जो सध्या काम करत आहे. Apple-1 केसेजवाल्या मदरबोर्डसह येतो. याचा की-बोर्ड आणि मॉनिटर वेगवेगळा सेल केला जात होता. Apple ने वुड केसिंगसह केवळ 200 कंप्यूटर तयार केले होते. या Wood केसिंग कंप्यूटरला चांगली पसंतीही मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.