मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple : LCD डिस्प्लेसह iPhone SE3 होणार लाँन्च; पाहा काय आहेत फीचर्स

Apple : LCD डिस्प्लेसह iPhone SE3 होणार लाँन्च; पाहा काय आहेत फीचर्स

मोबाईल मार्केटमध्ये अग्रस्थानी असलेल्या अॅपल कंपनीनं 2022 साली IPhone SE3  स्मार्टफोन लॉन्च (Apple launch IPhone SE3) करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : मोबाईल मार्केटमध्ये अग्रस्थानी असलेल्या अॅपल कंपनीने (Apple) आणखी एक धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारीत सुरू केली आहे. कंपनीनं 2022 साली IPhone SE3  स्मार्टफोन लॉन्च (Apple launch IPhone SE3) करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एलसीडी डिस्प्ले, अपग्रेडेड कनेक्टिविटी असणार आहे.

त्याचबरोबर न्यूरल इंजनसोबतच मोबाईलच्या पुढच्या आणि मागच्या भागातही कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळं आता ग्राहकांना या (IPhone SE3) मोबाईल लॉन्चिंगची उत्सुकता लागली आहे. या फोनमध्ये नवा चिपसेट असणार आहे. आता या फोनची किंमत 399 डॉलर म्हणजेच 30 हजार रूपयांच्या आसपास असणार आहे.

WhatsApp प्रायव्हेट असताना Ananya-Aryan चं चॅट NCB च्या हाती कसं लागलं?

या आयफोनमध्ये 4.7 इंच ची एलसीडी स्क्रिन, अॅल्युमिनियम बॉडी असलेला टच-आईडी सेंसर/होम बटनचीही सुविधा देण्यात येणार आहे. या फोनच्या मागे आणि पुढे असे दोन कॅमेरे देण्यात आले आहे. अॅपल कंपनीने याविषयी बोलतावा माहिती दिली की आम्ही या फोनमध्ये तीन बदल केलेले आहेत. त्यामुळं त्यामुळं यूजर्सला त्याचा फायदा होईल.

जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत

अॅपल कंपनीने कायमच मोबाईल (mobile Phones market) मार्केटमध्ये आपला दबदबा ठेवलेला आहे. त्यातच ते आता या मोबाईलला लॉन्च करण्याची तयारी करत असल्याने आता भारतातील ग्राहकांनाही या मोबाईलची उत्सुकता लागलेली आहे. कारण जबरदस्त सुविधांसह मिळणारा हा मोबाईल फोन इतर अॅपल स्मार्टफोन्सच्या तुलनेत स्वस्तही असणार आहे. त्यामुळं अॅपलच्या या स्मार्टफोनमुळं कमी बजेटमध्ये ग्राहकांना हा फोन विकत घेता येणार आहे.

First published:

Tags: Apple, Iphone, Mobile Phone