नवी दिल्ली, 14 जानेवारी : उत्तम लूक्स आणि पॉवरफुल फीचर्समुळे ‘अॅपल आयफोन’ ही अनेकांची पसंती असते. अॅपल कंपनीने ‘आयफोन 14’ सीरिज लाँच केला. त्यातलं ‘आयफोन 14 प्रो’ मॉडेल आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे. त्याची किंमत जास्त असल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे; पण आता एक असा स्मार्टफोन आला आहे, जो ‘आयफोन 14 प्रो’ मॉडेलसारखाच दिसत असून त्याची किंमतही खूपच कमी आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
‘आयफोन 14 प्रो’ हे एक ट्रेंडिंग मॉडेल आहे. तुम्हाला केवळ प्रचंड किमतीमुळे आयफोन खरेदी करता येत नसेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता एक असा स्मार्टफोन बाजारात आला आहे, ज्याचं डिझाइन ‘आयफोन 14 प्रो’सारखंच आहे. या स्मार्टफोनची किंमतही इतकी कमी आहे, की ज्यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. हा स्मार्टफोन नेमका कोणता आहे, ते जाणून घेऊ या.
हेही वाचा - टेम्पर्ड ग्लास लावली, तरीही का फुटतो स्मार्टफोनचा स्क्रीन?, जाणून घ्या, काय आहे कारण?
आयफोन 14 प्रो सारख्या दिसणाऱ्या या स्मार्टफोनचं नाव आहे ‘लेईको एस 1 प्रो’ (LeEco S1 Pro). या फोनमध्ये उत्कृष्ट फीचर्स आहेत. सध्या तो चीनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये ग्राहकांना 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचा रिफ्रेश रेट 60HZ आहे. युझरला या फोनचं 8GB + 128GB मॉडेल खरेदी करण्यासाठी 899 युआन म्हणजेच 10,897 रुपये द्यावे लागतील. यामध्ये Unisoc T 7150 चिपसेट बसवण्यात आलाय.
लेईको स्मार्टफोनमध्ये आणखी एक उत्कृष्ट फीचर आहे, ते म्हणजे डायनॅमिक आयलंड. हा स्मार्टफोन 4GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा ऑप्शनमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आलाय.
आयफोनसारखं डिझाइन
लेईको स्मार्टफोनचं पुढच्या आणि मागच्या बाजूचं डिझाइन आयफोन 14 प्रो प्रमाणेच आहे. हे दोन्ही फोन शेजारी ठेवले, तर त्यातला आयफोन नेमका कोणता, हे सहजासहजी ओळखता येणार नाही. त्यामुळेच बाजारात या स्मार्टफोनची जोरदार चर्चा होत आहे.
आयफोनचा वापर करण्याची अनेकांची इच्छा असते. मोठ्या डिस्काउंटमध्ये हा फोन कधी मिळतो, याची अनेक जण वाट पाहत असतात; पण आयफोन केवळ किंमत जास्त असल्यामुळे घेऊ न शकणाऱ्यांसाठी आयफोनसारखा दिसणारा लेईको फोन एक चांगला पर्याय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Mobile, Photo, Tech news, Top trending