स्मार्टफोन ही आता गरजेची वस्तू बनली आहे. बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. स्मार्टफोनसोबत कव्हर, हेडफोन, चार्जर आदी अॅक्सेसरीज वापरण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. स्मार्टफोनचा स्क्रीन खराब होऊ नये, स्मार्टफोन पडला तर स्क्रीन फुटू नये यासाठी बहुतांश जण त्यावर टेम्पर्ड ग्लास लावतात. बऱ्याच वेळा हे टेम्पर्ड ग्लास फक्त तुमचा फोन स्क्रॅचपासून वाचवू शकतात. 100 रुपयांत मिळणारे स्क्रीन गार्ड तुमच्या फोनचा स्क्रीन सुरक्षित ठेवू शकत नाही. याचाच अर्थ स्वस्तात मिळणारे टेम्पर्ड ग्लास फोनसाठी पूर्णतः सुरक्षित नाहीत. स्क्रीनच्या सुरक्षिततेसाठी महागडा स्क्रीन गार्ड खरेदी करावा लागतो. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
स्मार्टफोनचा स्क्रीन जास्त सुरक्षित राहावा यासाठी स्क्रीन गार्डचा वापर केला जातो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन गार्ड मिळतात. काही जण स्क्रीन गार्डला टेम्पर्ड ग्लास असंही म्हणतात. रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून स्क्रीन गार्ड खरेदी केला, तर तो सुमारे 100 रुपयांना मिळतो. काही विक्रेते ही ग्लास 50 रुपयांनादेखील विकतात. काही वेळा या ग्लासची किंमत स्मार्टफोनच्या मॉडेलनुसार बदलते. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्क्रीन गार्डच्या किमती 100 रुपये ते 1000 रुपयांदरम्यान आहेत. स्क्रीन गार्डच्या किमती अशा निरनिराळ्या का आणि गार्ड लावूनही फोनचा स्क्रीन फुटू कसा शकतो, असा प्रश्न मनात येत असेल. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
फोन स्क्रॅचपासून वाचवायचा असेल तर असे स्वस्त स्क्रीन गार्ड यासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु, फोन फुटण्यापासून संरक्षण हवं असेल तर हे स्क्रीन गार्ड त्यासाठी उपयुक्त नाहीत. उलट काहीवेळा या गार्डमुळे स्क्रीन फुटण्याचा धोका वाढतो. डिस्प्लेवर जाड स्क्रीन गार्ड लावल्यानंतर स्क्रीन आणि कव्हरमधलं अंतर जवळपास संपुष्टात येते. यामुळे फोन पडलाच, तर त्याचा परिणाम डिस्प्लेवर होतो. स्क्रीन गार्ड नसेल तर हा धोका कदाचित कमी होऊ शकतो.
बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त टेम्पर्ड ग्लास किंवा स्क्रीन प्रोटेक्टर फोनच्या स्क्रीनला स्क्रॅचेसपासून वाचवू शकतात; पण फोन पडल्यावर हे गार्ड त्याची सुरक्षा करू शकत नाहीत. त्यामुळे फोन चुकून पडला आणि स्क्रीन फुटला नाही तर केवळ नशीब समजावं. 2000 रुपये किंमत असलेले स्क्रीन गार्ड फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतात. कारण हे गार्ड्स तयार करण्यासाठी दर्जेदार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. समजा फोन पडला तर त्याचा थेट दाब स्क्रीनवर पडणार नाही, अशा पद्धतीनं गार्डची रचना केलेली असते. यासाठी वापरली जाणारी काचदेखील सामान्य ग्लासपेक्षा वेगळी असते. त्यामुळे अशा स्क्रीन गार्डची किंमत जास्त असते.
हेही वाचा - Eating Habits : तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा होते का? हा उपाय करून मिळवा सुटका
टेम्पर्ड ग्लास ऑनलाइन सर्च करत असाल तर तुम्हाला तिथं 100 रुपयांपासून 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ग्लास विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दिसेल. इंडिया मार्टवर या ग्लासची श्रेणी पाहिली असता, मार्केटच्या तुलनेत तिथे टेम्पर्ड ग्लासची किंमत तुलनेनं कमी असल्याचं दिसून आलं. काही विक्रेते हे ग्लास आठ रुपये प्रति युनिटपेक्षाही कमी दराने विक्री करत आहेत. काही ग्लासची किंमत 28 रुपये प्रति नग आणि काही खास ग्लासची किंमत तर 100 रुपयांपर्यंत होती. या साइटवरचे बहुतांश ट्रेडर्स नवी दिल्लीतले आहेत. त्यामुळे इथून टेम्पर्ड ग्लास घाऊक दरात विकत घेता येतो. इथून तुम्ही स्वतःला टेम्पर्ड ग्लास नक्कीच विकत घेणार नाही. त्याचवेळी पुरवठादार कधीकधी दरांमध्ये सौदेबाजी करतात. अर्थात तुम्ही किती युनिट्स ऑर्डर करत आहात यावर ते अवलंबून आहे. येथे खरेदी केलेले टेम्पर्ड ग्लास मार्केटमध्ये 100 रुपयांना विकले जातात; मात्र यामध्ये दुकानदाराचे इतर अनेक खर्चही समाविष्ट असतात. हे ग्लास तुमच्या फोनसाठी सुरक्षित ठरतील असं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smart phone, Smartphones, Technology