Home /News /technology /

iPhone 13 च्या नावाने असा होतोय Online Fraud, Instagram वर अनेक युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात

iPhone 13 च्या नावाने असा होतोय Online Fraud, Instagram वर अनेक युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात

अनेक इन्स्टाग्राम युजर्सला Free iPhone 13 गिफ्टबाबत पोस्ट आणि कमेंट्समध्ये टॅग केलं गेलं आहे. स्कॅमर्स फेक अकाउंट्स आणि प्रमोशनद्वारे फसवणूक करत आहे.

  नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या वापरादरम्यान सायबर क्राइमच्या (Cyber Crime) घटनांमध्येही वाढ होत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर क्रिमिनल्स विविध मार्गांचा वापर करत आहेत. कधी एखाद्या ऑफरद्वारे तर कधी पर्सनल डिटेल्स मिळवून फसवणूक केली जाते. इन्स्टाग्रामवर (Instagram) आता लोकांना फ्री आयफोन 13 मॅक्स प्रो (iPhone 13 Max Pro) जिंकण्याचा मेसेज पाठवून त्यांची फसवणूक केली जात आहे. आतापर्यंत अनेक जणांची यात फसवणूक झाली आहे. तर काहींनी हा फ्रॉड मेसेज (iPhone 13 scam) असल्याचं ओळखून या स्कॅमबाबत आता इतरांना सावध करत आहेत. काय आहे फ्रॉड मेसेज - हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम युजर्सला इन्स्टाग्राम पोस्ट किंवा कमेंट्समध्ये 'अभिनंदन तुम्ही iPhone 13 जिंकला आहे' असा मेसेज येतो. या मेसेजसह एक लिंकही शेअर केली जाते. त्यानंतर लिंकवर क्लिक करुन युजरला गिफ्ट घेण्यासाठी सांगितलं जातं. अनेक इन्स्टाग्राम युजर्सला Free iPhone 13 गिफ्टबाबत पोस्ट आणि कमेंट्समध्ये टॅग केलं गेलं आहे. स्कॅमर्स फेक अकाउंट्स आणि प्रमोशनद्वारे फसवणूक करत आहे. इन्स्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स Give-away कॅपेन्स चालवतात. परंतु हा त्यापैकी कोणताही प्रकार नसून हा पूर्णपणे ऑनलाइन फ्रॉडचा (Online Fraud) प्रकार आहे.

  हे वाचा - Digital Goldमध्ये केवळ 1 रुपयापासून सुरू करू शकता गुंतवणूक,पाहा महत्त्वाचे फायदे

  असं होतंय अकाउंट रिकामं - iPhone 13 गिफ्ट देत असल्याचं सांगत युजर्सला एक लिंक दिली जाते. गिफ्ट मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिथे रिडायरेक्ट केलं जातं, ते फेक वेबपेज असतं. इथे एक फॉर्म भरण्यासाठी सांगितला जातो. या फॉर्ममध्ये युजर्सची पर्सनल माहिती मागितली जाते. नंतर युजरकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स मागून शिपिंग चार्जेस म्हणून काही रक्कम मागितली जाते. ज्यावेळी युजर हे डिटेल्स भरतो, त्यावेळी कार्ड डिटेल्स (Card Detail) आणि डेटा चोरी केला जातो.

  हे वाचा - eKYC Update साठी कॉल, मेसेज आला? सावध व्हा, एका सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट

  फसवणूक करणारे फ्रॉडस्टर्स iPhone 13 साठी अतिशय कमी शिपिंग फी मागत आहेत. एखाद्याने एका रुपयांचं पेमेंट केलं तरी स्कॅमर्सला कार्ड आणि पेमेंटसंबंधी माहिती मिळते. याच माहितीचा वापर करुन बँक अकाउंट रिकामं केलं जातं. त्यामुळे ऑनलाइन आलेल्या कोणत्याही ऑफर्सवर विश्वास ठेवू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. जर लिंकवर क्लिक केलं असेल तरी पुढील कोणतेही पर्सनल डिटेल्स भरू नका.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Instagram, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या