मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /भारतातील सर्वांत वेगवान ब्रॉडबँड नेटवर्क 'जिओ'चं; मोबाइल डेटाच्या स्पीडमध्ये या कंपनीने मारली बाजी

भारतातील सर्वांत वेगवान ब्रॉडबँड नेटवर्क 'जिओ'चं; मोबाइल डेटाच्या स्पीडमध्ये या कंपनीने मारली बाजी

फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनच्या बाबतीत भारत सर्वांत वेगवान देश ठरला आहे. मोबाईल गतीच्या बाबतीत मात्र भारत मागे असल्याचं ओक्लाच्या अहवालात म्हटलं आहे.

फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनच्या बाबतीत भारत सर्वांत वेगवान देश ठरला आहे. मोबाईल गतीच्या बाबतीत मात्र भारत मागे असल्याचं ओक्लाच्या अहवालात म्हटलं आहे.

फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनच्या बाबतीत भारत सर्वांत वेगवान देश ठरला आहे. मोबाईल गतीच्या बाबतीत मात्र भारत मागे असल्याचं ओक्लाच्या अहवालात म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 11, मार्च : ओक्ला (Ookla) या नेटवर्क स्पीड ट्रॅकरच्या ताज्या अहवालानुसार जिओ (JIO) ही भारतातील सर्वांत वेगवान ब्रॉडबँड नेटवर्क (Fastest Broadband Network) असलेली कंपनी ठरली आहे. वोडाफोन-आयडिया अर्थात 'व्हीआय'नं (Vi) सर्वांत वेगवान मोबाइल डेटा (Mobile Data) देणारी कंपनी असा मान पटकावला आहे. 2020 च्या शेवटच्या तिमाहीत Vi नं तिसऱ्या तिमाहीतील एअरटेलच्या (Airtel) मोबाईल डाउनलोड वेगापेक्षा अधिक वेगावान सेवा देऊन आघाडी घेतली आहे, असं ओक्लानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. 'गॅजेट्स 360'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    दक्षिण आशियाई देशांच्या सार्क (SAARC) संघटनेतील देशांमध्ये फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनच्या बाबतीत भारत सर्वांत वेगवान देश ठरला आहे. मोबाईल गतीच्या बाबतीत मात्र भारत मागे असल्याचं ओक्लाच्या अहवालात म्हटलं आहे.

    ओक्लाच्या 2020 च्या चौथ्या तिमाहीतील अहवालानुसार, फिक्स ब्रॉडबँडमध्ये वेगवान म्हणजेच डाउनलोड वेग सर्वाधिक असणारा जिओ हा एकमेव सेवा पुरवठादार आहे. त्याला 3.7 मानांकन मिळालं आहे. ग्राहकांचं समाधान या निकषातही जिओ हा एकमेव पॉझिटिव्ह एनपीएस (नेट प्रमोटर स्कोअर-NPS) ठरला आहे. यात एसीटी (ACT) दुसऱ्या, एअरटेल तिसऱ्या आणि एक्झिटेल (Excitel) चौथ्या स्थानावर आहे. बीएसएनएल (BSNL) ही फिक्स ब्रॉडबँड क्षेत्रात सर्वांत कमी डाउनलोड वेग असणारी कंपनी ठरली आहे. त्याहीपेक्षा कमी वेग आणि सर्वांत कमी एनपीएस हॅथवेला (Hathway) मिळालं आहे.

    (वाचा - जगातील सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी; प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला तयार होणार एक गाडी)

    2020 मध्ये सार्क देशांपैकी भारत हा फिक्स्ड ब्रॉडबँडमध्ये सर्वाधिक डाउनलोड वेग (Download Speed) असणारा देश ठरला आहे. दुसऱ्या तिमाहीपासून भारतामध्ये फायबर लाइन (Fibre Line) टाकण्याबाबत वेगवान कार्यवाही झाल्यानं भारताची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली आहे.

    मोबाइल डेटाचा (Mobile Data) विचार केला, तर 2020च्या चौथ्या तिमाहीत 'Vi'चा मोबाइल डाउनलोड वेग सर्वाधिक होता. या स्पर्धेत 3.1 रेटिंग मिळवून एअरटेल दुसर्‍या स्थानावर आहे; पण त्याचा एनपीएस स्कोअर कमी आहे. 2.9 रेटिंग मिळवून जिओ तिसर्‍या स्थानावर होता. या तिन्ही दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एकाचाही एनपीएस स्कोअर सकारात्मक नव्हता. मोबाईल डाउनलोड वेगाबाबत सार्क देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर होता.

    (वाचा - इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, वाचा अनोख्या मंदिराची कहाणी)

    मालदीव (Maldives) हा एकमेव सार्क देश होता जिथे 2020 मध्ये 5G सेवा कार्यान्वित झाली. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि भूतान हे देश अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होते. सर्वांत कमी मोबाइल डाउनलोड वेग अफगाणिस्तानमध्ये होता.

    भारतातील 5G सेवेबाबतही या अहवालात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार 2021 च्या अखेरीस किंवा 2022 च्या सुरुवातीस स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर एअरटेल कमर्शियल 5G नेटवर्क सेवा पुरवण्यास तयार आहे. हैदराबादमध्ये त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

    जिओ स्वतः विकसित केलेलं ओ-आरएएन 5G नेटवर्क दाखल करण्यास सज्ज झालं आहे. पुरेसं वायरलेस स्पेक्ट्रम उपलब्ध न केल्यास, एलटीई आणि 5G तंत्रज्ञान अति-वेगवान गतीची इंटरनेट सेवा देऊ शकणार नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news, Technology, Vodafone, Vodafone idea tariff plan