मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Indian Railways प्रवाशांसाठी Good News; प्रवासात जेवणाचं टेन्शन जाणार, ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू

Indian Railways प्रवाशांसाठी Good News; प्रवासात जेवणाचं टेन्शन जाणार, ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू

तुम्ही दिवाळी-छठला रेल्वेने गावाकडे जाणार असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्ही दिवाळी-छठला रेल्वेने गावाकडे जाणार असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्ही दिवाळी-छठला रेल्वेने गावाकडे जाणार असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाउनमुळे भारतीय रेल्वेची ( Indian Railways ) गेल्यावर्षी रेल्वे सेवा ही बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेच्या सर्व सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहेत. मात्र, रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाशांना देण्यात येणारी ई-केटरिंग सेवा कोरोनामुळे अनेक दिवस बंद होती. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता कोरोनाची परिस्थिती सुधारत असून आयआरसीटीसी (IRCTC) ने पुन्हा एकदा ई-केटरिंग (e Catering) सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.

तुम्ही दिवाळी-छठला रेल्वेने गावाकडे जाणार असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस संसर्गामुळे रेल्वेगाड्यांमधील बेड रोल आणि पॅन्ट्री कारमधून ताजं अन्न देण्याची सेवा प्रवाशांसाठी बऱ्याच काळापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वेत जेवणाची गैरसोय होत होती. मात्र आता सणासुदीच्या काळात घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे.

हेही वाचा-  WhatsApp Update! दिवाळीत 3 नवे फीचर्स लाँच, तुम्हाला असा होणार फायदा

 आयआरसीटीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या सीटवर बसून ताजे आणि गरम जेवण ऑर्डर करू शकतात. सध्या ही सेवा 250 हून अधिक स्थानकांवर उपलब्ध आहे. तुम्हीही दिवाळीत प्रवास करत असाल आणि प्रवासादरम्यान जेवणाबाबत टेन्शनमध्ये असाल, तर मग तुमच्यासाठी ई-केटरिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. आयआरसीटीसीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अधिक माहितीसाठी तुम्ही http://ecatering.irctc.co.in किंवा आईआरसीटीसी फूड ऑन ट्रॅक (Food on track) अॅप डाउनलोड करू शकता. तसेच 1323 वर कॉल करू शकता.

ई-केटरिंगवरून असं मागवा जेवण

1. जेवण ऑर्डर करण्यासाठी, सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग वेबसाइट https://www.ecatering.irctc.co.in/ वर लॉग इन करा.

2. यानंतर, 10 अंकी पीएनआर क्रमांक टाका.

3. आता तुमच्या ट्रेननुसार कॅफे, आउटलेट्स किंवा क्विक रेस्टॉरंट सेवेच्या यादीमधून खाद्यपदार्थ ऑर्डर करा.

4. ऑर्डर करताना, पेमेंट पर्यायावर क्लिक करा.

5. यामध्ये तुम्ही ऑनलाइन आणि कॅश-ऑन-डिलिव्हरी पेमेंट करू शकता.

6. तुम्ही जेवणाची ऑर्डर देताच, जेवण तुमच्या सीटवर पोहोचवले जाईल.

हेही वाचा-  फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, facial recognition केलं बंद!

 आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केल्याने दिवाळी सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ई-केटरिंग सेवा बंद असल्यामुळे रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी स्वतःचा डबा जवळ बाळगत होते. मात्र, आता प्रवाशांचे रेल्वेमधील जेवणाचे टेन्शन हे दूर होणार आहे.

First published:

Tags: Indian railway