नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : फेसबुकची मालकी असलेलं मेसेजिंग अॅप WhatsApp (Messaging App) विशेष लोकप्रिय आहे. कोणीही हे अॅप सहज वापरू शकतं. खासगी चॅटसह अनेक ऑफिशियल कामांसाठीही अनेकजण WhatsApp चा वापर करतात. तसंच WhatsApp Web वर्जनचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स (New Features) आणि अपडेट्स (Updates) आणत असतं. आता दिवाळीच्या, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने आपल्या वेब वर्जनसाठी तीन खास फीचर्स लाँच केले आहेत.
WhatsApp Web मध्ये फोटो एडिट सुविधा -
या नव्या फीचरद्वारे आता व्हॉट्सअॅप वेब वापरणारे युजरही फोटो एडिट (Photo Edit) करू शकतील. याआधी व्हॉट्सअॅपच्या वेब वर्जनवर एखाद्याला फोटो पाठवायचा असेल, तर फोटो एडिट करण्याचा काहीही पर्याय उपलब्ध नव्हता. आता WhatsApp Web मध्ये मीडिया एडिटर फीचर (Media Edit Feature) देण्यात आलं आहे. त्यामुळे आता WhatsApp Web वापरतानाही फोटो एडिट करता येणार आहे.
डिटेल लिंक्स पाहण्याची सुविधा -
या आधी व्हॉट्सअॅपच्या वेब वर्जनवर एखादी लिंक (Link) शेअर केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती लिहिली जात नव्हती. लिंकचा फक्त एक छोटासा भाग दिसत होता. आता यात सुधारणा करण्यात आली असून, नवीन फीचरमध्ये लिंक प्रीव्ह्यू (Link Preview) वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर लिंक्स डिटेलमध्ये पाहता येऊ शकतात.
चॅटिंग करताना मिळतील स्टिकरसाठीच्या सूचना -
व्हॉट्सअॅपने खूप पूर्वीच इमोजीसोबत (Emoji) स्टिकर्सचा (Stickers) पर्याय दिला आहे. याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता WhatsApp Web मध्येही चॅटिंग (Chatting) करताना तुमच्या चॅटनुसार स्टिकर्सच्या सूचना मिळतील. त्यामुळे तुम्हाला योग्य स्टिकर्स शोधत बसावे लागणार नाहीत. तुमच्या चॅटनुसार तुम्हाला स्टिकर्स उपलब्ध होतील, त्यामुळे निवडीला चांगला वाव मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp News, WhatsApp user